शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या चौकटीत सरकारवर टीकेचा अधिकार; प्राध्यापकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस यंत्रणेची SC कडून कानउघडणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 07:24 IST

प्राध्यापक जावेद अहमद हजाम यांनी १३ आणि १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान आपल्या व्हॉट्सॲप समूहावर मेसेज टाकले होते.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निषेधार्थ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणाऱ्या कोल्हापूरच्या एका प्राध्यापकाविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्दबातल करताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांची कानउघाडणी केली आहे. 

प्रत्येक टीका किंवा निषेधाविरुद्ध भादंवि कलम १५३ अ खाली गुन्हा नोंदविला जाणार असेल तर देशात लोकशाही शाबूतच राहणार नाही, असे भाष्य सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना केले. कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीवर टीका करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, असे नमूद करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या पीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवला. 

प्राध्यापक जावेद अहमद हजाम यांनी १३ आणि १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान आपल्या व्हॉट्सॲप समूहावर मेसेज टाकले होते.

पोलीस यंत्रणेला राज्य घटनेतील अनुच्छेद १९ (१) (अ) अन्वये लाभलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या संकल्पनेची जाणीव करुन शिक्षित करण्याची वेळ आली आहे, असे निरिक्षण सर्वाेच्च न्यायालयाने नाेंदविले.

काय आहे नागरिकांचा अधिकार?- संविधानाच्या अनुच्छेद १९ (१) (अ) अन्वये असहमती व्यक्त करण्याचा नागरिकांना विधिसंमत आणि कायदेशीर अधिकार लाभला आहे. - सरकारच्या निर्णयांचा शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविणे हा लोकशाहीचा अनिवार्य भाग आहे. - कायदेशीर मार्गाने मतभिन्नता व्यक्त करणे हे अनुच्छेद २१ ने दिलेल्या अधिकारात मोडते. मात्र, असहमती किंवा निषेध लोकशाहीच्या चौकटीतच असायला हवी. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारPoliceपोलिसCourtन्यायालय