शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

१७ दिवसांची प्लॅनिंग, ७० हजारांचा वाद अन्... १६ वर्षाच्या पुतण्याने केली काका आणि भावाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:02 IST

दिल्लीतील शाहदरा येथे दिवाळीच्या रात्री झालेल्या काका-पुतण्याच्या दुहेरी हत्याकांडातील अल्पवयीन आरोपीला अटक केल्यानंतर खुनाचे कारण समोर आले आहे.

Delhi Shahdara Murder:दिल्लीतील शाहदरा भागात ४० वर्षीय आकाश शर्मा आणि त्यांच्या पुतण्याला फटाके फोडत असताना गोळ्या घालून ठार करण्यात आले. या हल्ल्यात १० वर्षांचा मुलगाही जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये १६ वर्षांचा मुलगा हल्लेखोरासह स्कूटरवरून आकाश यांच्या घरी पोहोचला. त्याने आधी आकाश यांच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर अल्पवयीन आरोपीने इशारा करताच स्कूटरवरून आलेल्या व्यक्तीने आकाश यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोराने पुतण्यावरही गोळ्या झाडल्या. आकाश यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगा हा त्यांचाच नातेवाईक असल्याचे समोर आलं आहे.

पूर्व दिल्लीतील शाहदरा येथील फरश बाजार परिसरात दिवाळीच्या दिवशी झालेल्या काका-पुतण्याच्या दुहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार  १६ वर्षांचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलाने हत्येसाठी शूटर नेमला होता. या हत्येची योजना त्याने १७ दिवस अगोदरच आखली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र आता मृत आकाश यांचा भाऊ योगेश यांच्या म्हणण्यांनुसार अल्पवयीन मुलगा हा त्यांचाच पुतण्या आहे आणि पैशांच्या वादातून हे सर्व घडलं आहे.

"ही घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० ते ८.०० वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीवरून माझा पुतण्या आणि एक अनोळखी व्यक्ती असे दोन जण आले होते. माझ्या भावाचा आणि मुलाचा दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने खून केला. काही महिन्यांपूर्वी माझ्या भावाचा पैशावरून कोणाशी तरी वाद झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार माझा पुतण्या आहे. तो माझ्या मामाच्या मुलाचा मुलगा आहे. तो आला आणि त्याने माझ्या भावाच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर त्याला मारले. माझ्या मुलाने त्याच्या काकांच्या हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही मारण्यात आले. अल्पवयीन आरोपीने आकाशकडून पैसे घेतले होते आणि ते परत मागितल्यावर त्याने आकाशच्या हत्येचा कट रचला," असा दावा योगेशने केला आहे. 

तसेच पैशांच्या वादातूनच महिन्याभरापूर्वी अल्पवयीन आरोपीने स्वतःच्याच घरावर गोळीबार करुन आमच्यावर आरोप केले होते. ते प्रकरण मिटल्यानंतर अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी आम्हाला फोन करुन पैसे द्या नाहीतर माझा  मुलगा तुम्हाला मारेल आणि तो अल्पवयीन असल्याने लवकर सुटेल अशी धमकी दिली होती, असे योगेशने सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, मृत आकाशने आरोपी अल्पवयीन मुलाला काही काम दिले होते, त्यासाठी त्याला ७० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. काम पूर्ण झाल्यानंतर आकाश ना पैसे देत होता ना आरोपीचा फोन उचलत होता. यामुळे अल्पवयीन चांगलाच संतापला होता. त्याने कॉन्ट्रॅक्ट किलर नेमला आणि दिवाळीच्या दिवशी संधी बघून आकाशचा खून केला. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस