शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आला धावून, प्रदूषणाचे धुरके गेले विरून; दिल्लीकरांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 06:41 IST

प्रदूषणाचा भार न्यायालयावर टाकू नका : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले

नवी दिल्ली : प्रदूषणाची जबाबदारी झटकून न्यायालयावर भार टाकू नका, असे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारत स्पष्ट केले की, सम-विषम कार रेशनिंग योजना सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. न्यायालय त्यावर कोणतेही निर्देश देणार नाही. दरम्यान, दिल्लीत रात्रभर पडलेल्या पावसाने प्रदूषणकारी धुरके विरले असून, धोकादायक वायू प्रदूषणापासून नागरिकांना दिलासा मिळाला.

सम-विषमचा संबंध नाहीदिल्ली-एनसीआरमधील हवेच्या बिघडलेल्या गुणवत्तेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, सम-विषम योजनेशी न्यायालयाचा काहीही संबंध नाही आणि तो लगतच्या राज्यांमधून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या टॅक्सींनाही लागू करावा, असे त्यांनी कधीच म्हटले नाही. दिल्ली सरकारने यापूर्वी जाहीर केले होते की, ते दिवाळीनंतर १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत विषम-सम योजना लागू करणार आहे. त्यावेळी वायू प्रदूषण शिखरावर जाण्याची जास्त शक्यता आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक ३७६ वरनवी दिल्ली आणि परिसरात रात्रभर पडलेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत झपाट्याने सुधारणा झाली आणि १० दिवसांपासून पसरलेले धुरके दूर झाले. महानगराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सकाळी ९ वाजता ३७६ वर होता. तो शुक्रवारी सकाळी ७ वाजता ४०८ आणि गुरुवारी रात्री ११ वाजता ४६० वर होता. सफदरजंग वेधशाळेने शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता संपलेल्या २४ तासांत ६ मिमी पावसाची नोंद केली आहे.

शेतकचरा जाळणे थांबवावे लागेलदिल्लीला लागून असलेल्या पंजाब आणि इतर काही राज्यांमध्ये शेतकचरा जाळण्याचे प्रकार थांबवावे लागेल आणि नवी दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी उपाय शोधला पाहिजे, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. 

टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषण