शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पंपावर उडाली धांदल... पेट्रोल भरलं, बटण स्टार्ट करताच स्कुटीने पेट घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:27 IST

सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावर ही घटना घडली

छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यात पेट्रोल पंपावरआगीचा भडका उडाल्याने सर्वांची धांदल उडाली होती. स्कुटीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या  एका चालकासोबत ही घटना घडली. स्कुटीत पेट्रोल भरल्यानंतर संबंधित वाहनचालकाने गाडी सुरू करण्यासाठी स्टार्टर बटन दाबताच तिथे आग लागली. सेल्फ स्टार्टचे बटन दाबताच गाडीत आगीचा भडका उडाला. त्यामुळे, तो वाहनचालक तरुण गाडी जागेवरच सोडून दूर पळाला. मात्र, पेट्रोल पंपावरी कर्मचाऱ्यांमध्ये धांदल उडाली. 

सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावर ही घटना घडली. दुर्ग शहरातील पटेल चौक येथील पेट्रोल पंपावर एक युवक पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्याने, स्कुटीत पेट्रोल भरल्यानंतर पैस देऊन पुढे आला. त्यावेळी, बटनस्टार्ट करुन गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टार्टचे बटन दाबताच गाडीच्या इंजिनमध्ये आग लागली. त्यामुळे, चालकाने तात्काळ गाडी जागेवर ठेऊन धूम ठोकली. मात्र, ही आग पेट्रोल पंपाजवळच असल्याने येथील कर्मचारी सैरावैरा पळू लागले.

पेट्रोल पंपावरील संपूर्ण स्टाफ यावेळी गाडीची आग विझवण्यासाठी समोर आला. काहींनी फायर टेंडरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर काहींना बादलीत असलेल्या वाळूने आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच, काहींनी पाईपाद्वारे पाण्याचा प्रेशरही सोडला होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, आग विझेपर्यंत स्कुटी पूर्णपणे जळाली होती.

दरम्यान, आग स्कुटीच्या पेट्रोल टाकीपर्यंत पोहोचली असती तर मोठा भडका उडाला असता, त्यात पेट्रोल पंपाच्या टाकीपर्यत पोहचली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. येथील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि प्रसंगावधानता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.  

टॅग्स :AccidentअपघातfireआगPetrol Pumpपेट्रोल पंपChhattisgarhछत्तीसगड