शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

शिवराज सिंह सरकारची अडचण वाढणार! दारूबंदीवर उमा भारतींनी घेतली मोठी भूमिका, दिला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 20:52 IST

...आता ओरछामध्ये जे काही होईल ते संपूर्ण मध्यप्रदेशसाठी उदाहरण बनेल, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी राज्यातील दारू बंदीसंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. त्या सातत्याने अयोध्या आंदोलनाची आठवण करून देत, आता ओरछामध्ये जे काही होईल ते संपूर्ण मध्यप्रदेशसाठी उदाहरण बनेल, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.

भाजपच्या फायर ब्रँड नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमा भारती यांनी काही दिवसांपूर्वीच बुंदेलखंडच्या ‘अयोध्या’ ओरछामध्ये एका दारूच्या दुकानावर शेन फेकले होते. या घटनेनंतर संबंधित दारूचे दुकान बंद करण्यात आले होते. मात्र, भाऊबीजेच्या दिवशी हे दुकान पुन्हा उघडण्यात आले.

उमा भारती कठोर - हे दुकान उघडलेले पाहून उमा भारती भडकल्या आहेत. त्या 27 ऑक्टोबरला ट्विट करत म्हणाल्या, ‘मला अयोध्येची खूप आठवण आली. अयोध्येने आपल्याला लोकसभेच्या दोन जागांवरून दोन वेळा केंद्रात बहुमताने सरकार बनवण्याची कुवत दिली. ढांचा पडला, तेव्हा ते बेकायदेशीर कृत्य मानले गेले. आम्हा सर्वांकडे गुन्हेगार म्हणून पाहिले गेले आणि शेवटी आमच्या गुन्ह्यानंतर आज भव्य राम मंदिर बांधले जात आहे.’ तसेच आणखी एका ट्विट मध्ये उमा भारती म्हणाल्या, ‘ओरछातील हे देशी-विदेशी दारूचे दुकान मला प्रेरणा देते, की येथे जे काही होईल, ते संपूर्ण मध्यप्रदेशसाठी एक उदाहरण ठरेल. बघुया काय होते.’

तत्पूर्वी, गेल्या काही दिवासंपूर्वी उमा भारती यांनी घोषणा केली होती, की त्या 7 नोव्हेंबरपासून घर सोडतील. 7 नोव्हेंबर ते 14 जानेवारीपर्यंत त्या घरात राहणार नाहीत. 7 नोव्हेंबरपासून लक्ष्य प्राप्ती पर्यंत, जोवर दारूसंदर्भातील नवे धोरण दिसत नाही, तोवर मी घरात राहणार नाही, मी जंगलात राहीन, उघड्यावर राहीन, तंबूत राहीन. धार्मिक स्थळांवर राहीन. मी नदीच्या काठावर अथवा झाडाखाली अथवा दारूच्या दुकानासमोर तंबू टाकीन.

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेश