उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची बुधवारी (६ ऑगस्ट) भेट घेतली. दिल्लीत झालेल्या या भेटीवेळी एकनाथ शिंदे यांनी मोदींना महादेवाची प्रतिमा भेट दिली. मोदींना महादेवाची प्रतिमा भेट देण्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदेंना विचारण्यात आले. यामागील कारण त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महादेवाची प्रतिमा भेट देण्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. शिंदे म्हणाले, "शंकराची प्रतिमा देण्याचे कारण जे ऑपरेशन महादेव! ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर काँग्रेस, इंडी आघाडीने जे आक्षेप घेतले, भारतीय लष्कराच्या शौर्यावर शंका उपस्थित केल्या. पंतप्रधान मोदींवर संशय उत्पन्न केल्या."
"ऑपरेशन महादेववर देखील त्यांनी संशय घेतला. ऑपरेशन महादेव यशस्वी झाले. तमाम देशवासीयांच्या मनात जी खंत होती, त्या अतिरेक्यांना ठार करण्याची, ती पूर्ण केली म्हणून आम्ही महादेवाची प्रतिमा त्यांना भेट दिली", असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.