शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जमिनीनंतर नोकरीवर गदा येण्याची शक्यता; रेल्वे घोटाळ्यातील नोकरदारांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 06:16 IST

रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमीन घोटाळ्याचा आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते.

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क

पाटणा : रेल्वेमध्ये जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात केवळ लालूप्रसाद यादव यांचे कुटुंबीयच नाही तर ज्यांनी नोकरी मिळवली, तेही अडचणीत आले आहेत. नोकरीसाठी त्यांनी जमीन तर दिलीच; पण आता नोकरीही जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावरील दोष सिद्ध झाला, जमीनही गेली आणि नोकरीही गेली, अशी त्यांची स्थिती होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. यात काही दस्तावेज व हार्ड डिस्क यांचाही समावेश आहे. जमीन देऊन नोकरी मिळविणाऱ्या १२ जणांनाही सीबीआयने आरोपी केले आहे. यात पाटण्याचे राजकुमार सिंह, मिथिलेश कुमार, अजय कुमार, संजय राय, धर्मेंद्र राय, विकास कुमार, पिंटू कुमार, दिलचंद कुमार, प्रेमचंद कुमार, लालचंद कुमार, अभिषेक कुमार व गोपालगंजचे हृदयानंद चौधरी यांचा समावेश आहे. सीबीआय या प्रकरणातील अन्य मुद्द्यांवर तपास करण्यात गुंतली आहे. या लोकांची कोणकोणत्या पदांवर कशा पद्धतीने नियुक्ती झाली आहे, याचीही चौकशी करण्यात येईल. याच बरोबर कुटुंबातील कोणत्या अन्य सदस्याच्या नावावरही जमीन करण्यात आली आहे का, याचाही तपास सुरू आहे. 

लालूंच्या कुटुंबीयांच्याही नावे केली जमीन

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात आरोपींनी लालूंना एक लाख वर्गफुटापेक्षा अधिक जमीन दिली आहे. या जमिनी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, त्यांच्या मुली मीसा भारती व हेमा यादव यांच्याही नावे करण्यात आल्या आहेत. गोपालगंज जिल्ह्याच्या इटवा गावातील रेल्वेमध्ये नोकरीत असलेल्या हृदयानंद याच्या घरी आढळलेल्या दस्तावेजांची छाननी केली जात आहे. त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे. सीबीआय सर्व तथ्यांची सुसंगतवार मांडणी करण्यात गुंतली आहे.

लालूप्रसाद यांना पुन्हा होऊ शकतो तुरुंगवास?

रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमीन घोटाळ्याचा आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुुटुंबीयांतील काही सदस्यांची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी करण्याच्या तयारीत असून लालूप्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते. सीबीआय लालूप्रसाद यांच्याव्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मिसा भारती आणि हेमा यादव यांची चौकशी करणार आहे. सीबीआयने  १८ मे रोजी एफआयआर दाखल केल्यानंतर सीबीआयने  शुक्रवारी लालूप्रसाद, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य आरोपींच्या १६ ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवIndian Railwayभारतीय रेल्वेCBIगुन्हा अन्वेषण विभाग