शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे भगवेकरण होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 07:06 IST

लोकांना या सरकारकडून मोठ्या बदलांची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात पोलिस खात्यापासूनच व्हायला हवी. या सरकारकडून परिवर्तनाचा संदेश लोकांपर्यंत जायला हवा. तुमची पूर्वीची वागणूक आमच्या सरकारमध्ये चालणार नाही.

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी  पोलिस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी पोलिस खात्याचे ‘भगवेकरण’ होऊ देणार नाही, असे सांगत भाजप राजवटीत घडलेल्या काही घटनांबद्दल अधिकाऱ्यांना खडसावले.

उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, “तुम्ही पोलिस खात्याचे भगवेकरण करणार आहात का? आमच्या सरकारमध्ये याला परवानगी नाही. मंगळूर, विजापूर, बागलकोट येथे भगवे कपडे घालून तुम्ही विभागाचा कसा अपमान केला हे मला माहीत आहे. जर तुम्हाला देशाबद्दल आदर असेल तर तुम्ही राष्ट्रध्वज घेऊन काम केले पाहिजे.’ शिवकुमार यांनी स्पष्ट केले की, लोकांना या सरकारकडून मोठ्या बदलांची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात पोलिस खात्यापासूनच व्हायला हवी. या सरकारकडून परिवर्तनाचा संदेश लोकांपर्यंत जायला हवा. तुमची पूर्वीची वागणूक आमच्या सरकारमध्ये चालणार नाही.

तेव्हा आमच्याशी कसे वागलात...डीके शिवकुमार यांनी भाजपच्या राजवटीत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर, सिद्धरामय्या आणि त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही पोलिसांवर केला. ते म्हणाले, “आम्ही जेव्हा ‘पे सीएम’ मोहीम केली तेव्हा तुम्ही माझ्याशी आणि सिद्धरामय्याशी कसे वागला हे मला माहीत आहे, मात्र, विरोधी पक्षावर गुन्हा दाखल झाला नाही. पोलिस अधिकाऱ्यांना आपला दृष्टिकोन बदलावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

‘केंद्र अध्यादेश आणून अधिकार गोठवील’केंद्र सरकार भविष्यात कर्नाटक आणि इतर राज्यांमधील सेवांवर नियंत्रण ठेवण्याचा अध्यादेशदेखील आणू शकते, असा इशारा ‘आप’चे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज यांनी बुधवारी दिला. अजय माकन कर्नाटकातील विजयाचा आनंद व्यक्त करत आहेत; पण त्यांनी लक्षात ठेवावे की, केंद्र उद्या कर्नाटकात असाच अध्यादेश आणेल.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटक