शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ विरोधातील याचिका तातडीने सुनावणीस घेणार; सर्वोच्च न्यायालयाने मागवला ई-मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:48 IST

या याचिका सूचीबद्ध करण्याच्या मागणीचा ई-मेल याचिकादारांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावा, असे आदेश खंडपीठाने दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका तातडीने सुनावणीसाठी घेण्याच्या दृष्टीने सूचीबद्ध करण्याचा विचार करू, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. सरन्यायाधीश संजीव खन्ना व न्यायमूर्ती संजयकुमार, न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने जमियत उलेमा मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार आणि केवी विश्वनाथन यांच्या बेंचने जमियत उलमा - ए - हिंदची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकला. त्यानंतर हे मत व्यक्त केले.

वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात दाखल झालेल्या १०हून अधिक याचिका त्वरित सुनावणीसाठी घ्याव्यात, अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी आणि वकील निजाम पाशा यांनीही खंडपीठाला केली. या याचिका सूचीबद्ध करण्याच्या मागणीचा ई-मेल याचिकादारांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावा, असे आदेश खंडपीठाने दिले. संसदेने विधेयक मंजूर केल्यानंतर काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्यासह आणखी काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली.

कायद्याला पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्याचे घर जाळलेवक्फ सुधारणा कायद्याला पाठिंबा दिल्याबद्दल भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मणिपूरचे अध्यक्ष अस्कर अली यांच्या घरावर एक जमाव चाल करून गेला.  त्यांच्या घराला आग लावण्य़ात आली. थौबल जिल्ह्यातील लिलाँग येथे रविवारी रात्री ही घटना घडली. त्यामुळे संपूर्ण लिलाँग विधानसभा मतदारसंघात सोमवारी जमावबंदी लागू करण्यात आली. अस्कर अली यांच्या घराची संतप्त जमावाने नासधूस करून ते जाळले.  त्या घटनेनंतर अली यांनी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 

आता भूमी जिहाद थांबणार; भाजप आमदाराचे वक्तव्यवक्फ सुधारणा कायदा अंमलात आल्याने आता देशातील भूमी जिहाद थांबेल असे तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी म्हटले आहे. रामनवमीच्या कार्यक्रमात रविवारी त्यांनी सांगितले की, जे वक्फ नोटीस देऊन जमिनीचा कब्जा करत होते त्यांना आता चाप बसणार आहे. बदललेल्या कायद्यामुळे मुस्लिमांची जमीन कोणीही हिसकावून घेणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयwaqf board amendment billवक्फ बोर्ड