शहरं
Join us  
Trending Stories
1
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
2
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
3
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
4
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
6
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
7
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
8
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
9
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
10
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
11
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
12
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
13
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
14
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
15
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
16
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
17
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
18
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
19
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
20
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ

रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 08:34 IST

रात्रीच्या अंधारात विकासला घरात शिरताना कुणीतरी पाहिले आणि त्याला चोर समजून आरडाओरडा केला. घरातील लोकही जागे झाले आणि सर्वांनी मिळून विकासला मारले.

मध्यरात्रीचा काळोख... एक तरुण चोरपावलांनी एका घरात शिरला. अचानक लाईट लागली आणि घरातील लोक जागे झाले. तरुणाला पाहताच ते ओरडले - "चोर! चोर!" मग काय विचारता? जमावाने त्याला बेदम मारहाण केली. तरुण गयावया करत म्हणाला, "कृपया एकदा माझं ऐका तरी!" त्याने मग स्वतःबद्दल अशी काही गोष्ट सांगितली की, त्या कुटुंबाने दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याला आपला जावई बनवून घेतले. आता या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील आहे.

खरं तर, ज्या घरात तो तरुण घुसला होता, तिथे त्याची प्रेयसी राहत होती. मध्यरात्री तो तिला भेटायलाच गेला होता. पण नशीबच खराब! प्रेयसीच्या घरच्यांनी त्याला चोर समजून बडवले. नंतर जेव्हा मुलाने खरं काय ते सांगितले, तेव्हा दुसऱ्याच दिवशी कुटुंबियांनी आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले.

चोर समजून मारले...मिळालेल्या माहितीनुसार, जासरपतहां पोलीस स्टेशन हद्दीतील करीमपूर खुर्द गावातील ही अजब-गजब घटना आहे. सोमवारी रात्री, खुटहन पोलिस स्टेशन हद्दीतील पनौली गावाचा रहिवासी विकास पासवान आपली प्रेयसी रुबीला भेटण्यासाठी गुपचूप तिच्या घरात घुसला. रात्रीच्या अंधारात विकासला घरात शिरताना कुणीतरी पाहिले आणि त्याला चोर समजून आरडाओरडा केला. घरातील लोकही जागे झाले आणि सर्वांनी मिळून विकासला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली.

आणि मग झाली चर्चा लग्नाची...पकडल्यानंतर जेव्हा तरुणाची चौकशी केली, तेव्हा त्याची ओळख विकास पासवान अशी पटली. विकासने सांगितले की, तो चोर नसून आपल्या प्रेयसीला भेटायला आला होता. त्याने आपल्या प्रेयसीचे नाव रुबी असल्याचे सांगितले. ही बाब रुबीकडे विचारली असता तिनेही दुजोरा दिला की, त्यांचे प्रेमप्रकरण सुरू आहे आणि तिला त्याच्यासोबतच राहायचे आहे. मग काय, दुसऱ्याच दिवशी सकाळी दोघांचे लग्न लावून देण्यात आले. आता या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी