शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचा लख्ख प्रकाश करतो झोपेचं खोबरं, जीवजंतूंवरही झाले परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 10:01 IST

निद्राचक्र बदलले; जीवजंतूंवरही झाले परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील मुंबईसह इतर महानगरे  २४ तास जागी असतात, असे म्हटले जाते. ती शहरे रात्री खूप प्रकाशमान असतात. त्यामुळे फार सुंदरही दिसतात. मात्र तिथे रात्री असलेल्या दिव्यांच्या झगमगाटामुळे पर्यावरण तसेच जीवजंतूंचे नुकसान होत आहे. शिवाय माणसाच्या निद्रेचे चक्रही या दिव्यांच्या प्रकाशामुळे बदलले आहे.

‘आर्टिफिशियल लाइट ॲट नाईट : स्टेट ऑफ दी सायन्स २०२२’ असे शीर्षक असलेल्या अहवालात म्हटले आहे की, प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रमाणात सतत वाढ होत आहे. जगातील ८० टक्के लोकसंख्या प्रकाशामुळे प्रदूषित झालेल्या वातावरणात राहते.

एलईडी दिव्याचे तोेटे अधिकअमेरिका-युरोपमध्ये प्रकाशामुळे होणारे प्रदूषण ९९ टक्के आहे. ब्रिटन, इटली, आयर्लंडमध्ये प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. सायन्स ॲडव्हान्सेज जर्नलच्या सप्टेंबरमधील अंकात एका लेखात म्हटले आहे की, एलईडी दिवा ऊर्जा वाचवितो हे खरे असले तरी सोडिअम लाईटच्या तुलनेत त्याचा प्रकाश प्रखर असतो. त्याचेही अनेक तोटे आहेत.

प्रखर प्रकाशामुळे दृष्टीवर होतो परिणामn मुंबई, पुुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आदी मोठ्या शहरांतील उड्डाणपुलांवर, रस्त्यांवर रात्रभर एलईडी लाईट लावण्यात येतात. n या एलईडीच्या प्रकाशामुळे माणूस व अन्य प्राण्यांचे निद्राचक्र भंग पावले आहे. त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो. n तसेच हृदरोग, मधुमेह, स्थुलत्व आदी विकार होण्याची शक्यता असते. प्रकाशाचे प्रदूषण शरीरातील प्रथिने व अन्य उपकारक गोष्टींचे प्रमाण कमी करते. 

४०% कमी झाला फुलांचा सुगंध

नैसर्गिक प्रकाशामुळे झाडे उत्तम प्रकारे वाढतात. पण, कृत्रिम प्रकाशात झाडांची नीट वाढ होत नाही. काही देशांत रातराणीच्या झाडाला फुले येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. काही फळांच्या चवीत फरक पडला आहे. गुलाब, रातराणी आदी फुलांचा सुगंध कृत्रिम प्रकाशामुळे ४० टक्के कमी झाला आहे. सोडियम व एलईडी लाईटमुळे पाळीव जनावरेही आक्रमक बनली आहेत, असे काही पाहण्यात आढळून आले. 

टॅग्स :NightlifeनाईटलाईफHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य