शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

नवीन वर्षाची सुरुवात पावसाने होणार; दिल्लीसह देशातील अनेक भागात हवामान बदलणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 18:20 IST

३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२४पर्यंत मध्य भारतासह उत्तर-पश्चिम भागात पाऊस पडू शकतो.

नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीसह देशाच्या उत्तर-पश्चिम भागात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान दिल्लीसह उत्तर-पश्चिम भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार, २९ डिसेंबरपासून जेव्हा पश्चिमी भूमध्यसागरीय क्षेत्र कमी पातळी पूर्वेकडील वाऱ्यांच्या संपर्कात येईल, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात दिसून येईल. यामुळे ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२४पर्यंत मध्य भारतासह उत्तर-पश्चिम भागात पाऊस पडू शकतो.

देशातील या भागात पावसाची शक्यता-

सध्या दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात चक्रीवादळ सुरु आहे. हे वादळ बांगलादेश आणि त्याच्या आसपासच्या भागातही दिसून येते. ज्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या पावसासह हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा आणि उत्तर मध्य प्रदेशात २५ डिसेंबरच्या सकाळी दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्ली-एनसीआर हवामानाची स्थिती काय?

दिल्लीच्या सध्याच्या हवामानाबद्दल बोललो, तर सध्या दिल्लीसह उत्तर भारताच्या मैदानी भागात किमान तापमान सामान्यपेक्षा १ ते ३ अंश सेल्सिअस जास्त आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहणार असून यादरम्यान पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २६ डिसेंबरपासून दिल्ली एनसीआरमध्ये आकाशात ढगांची हालचाल दिसू शकते आणि यादरम्यान तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअस नोंदवले जाऊ शकते. 

टॅग्स :Rainपाऊसdelhiदिल्लीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश