शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:01 IST

Telangana Accident News: तेलंगाणामधील जुन्या जिल्हाधिकारी भवनामध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. १९४१ साली चुना आणि विटांनी बांधलेल्या या ऐतिहासिक इमारतीचं छत सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळलं. धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्घटना घडली तेव्हा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री जुप्पली कृष्णारावा जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक घेत होते.

तेलंगाणामधील जुन्या जिल्हाधिकारी भवनामध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. १९४१ साली चुना आणि विटांनी बांधलेल्या या ऐतिहासिक इमारतीचं छत सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळलं. धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्घटना घडली तेव्हा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री जुप्पली कृष्णारावा जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक घेत होते. त्याचवेळी बैठक सुरू असलेल्या ठिकाणामागचा भाग धडाधड कोसळला. 

ही दुर्घटना घडली तेव्हा महसूल विभागासमोर तैनात दोन पोलीस कर्मचारी आणि सुमारे २० पेक्षा अधिक गाव महसूल अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर आपल्या पोस्टिंगची वाट पाहत होते. त्याचवेळी जोरदार आवाज आल्याने लोक घाबरून बाहेर पळाले. सुदैवाने छत कोसळत असतानाच सर्वजण सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याने या दुर्घटनेत कुठलीही हानी झाली नाही.  

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे या इमारतीच्या बाल्कनीचा पूर्ण भाग कोसळून दुर्घटना झाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाबाबेर ठेवलेल्या महत्त्वपूर्ण फाईल आणि इतर कागदपत्रेही कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दरम्यान, ही इमारती बरीच जुनी होती. तसेच तिच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.या दुर्घटनेनंतर प्रभारी मंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना इमारतीच्या जिर्ण भागाची दुरुस्ती करण्याची सूचना दिली आहे. तसेच येथील काही विभाग तात्पुरते इतर ठिकाणी हलवण्याचीही सूचना दिली आहे.   

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघात