शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन, या जिल्ह्यातील आहे रहिवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 13:57 IST

Parliament winter session 2023: लोकसभा आणि संसद भवन परिसरात गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज लोकसभेमध्ये धक्कादायक घटना घडली असून, दोन तरुणांनी संसदेची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उड्या मारल्या. तसेच तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत गोंधळ घातला. या तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच संसदेच्या आवारातही एका तरुणाने स्मोक कँडल पेटवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यापैकी एका तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

दोन तरुण आणि एक तरुणी अशा तिघांनी लोकसभा आणि संसदेच्या आवारात हा गोंधळ घातला असून, त्यांनी म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या नावाने पास बनवू संसदेत प्रवेश मिळवल्याची माहिती समोर आली आहे. संसदेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं नाव सागर असं असल्याची माहिती काही खासदारांनी दिली आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचं नाव नीलम सिंह असून, ती हरियाणातील हिसारमधील असल्याची माहिती समोर येत आहे. तर तिसरा अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातील लातूर येथील असल्याचे समोर आले आहे.

याबाबत माहिती देताना काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. त्यांनी काही वस्तू फेकल्या. त्यातून धूर येत होता. मात्र या तरुणांना खासदारांनी पकडले आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले.  संसदेच्या सुरक्षेमधील ही गंभीर चूक आहे असा आरोपही अधीररंजन चौधरी यांनी केला. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाMaharashtraमहाराष्ट्र