शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खुनी तलाव, दरवर्षी घेते तीन लोकांचा बळी, जायला वाटते भीती, तरीही होते पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 17:17 IST

Khooni Jheel: भारतामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिथे देश-विदेशातील लोक फिरायला येतात. अनेक अशाही जागा आहेत, जिथे जायला लोकांना भीती वाटते. या जागांबाबत वेगवेगळ्या कहाण्या ऐकिवात आहेत. असंच एक तलाव हे हरियाणातील फरिदाबाद येथे आहे.

नवी दिल्ली - भारतामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिथे देश-विदेशातील लोक फिरायला येतात. अनेक अशाही जागा आहेत, जिथे जायला लोकांना भीती वाटते. या जागांबाबत वेगवेगळ्या कहाण्या ऐकिवात आहेत. असंच एक तलाव हे हरियाणातील फरिदाबाद येथे आहे. या तलावाबाबतची माहिती ऐकल्यावर तुमची भीतीने गाळण उडेल. या तलावाचं नाव आहे खुनी तलाव. फरिदाबादमधील या तलावाला खुनी तलाव म्हणूनही ओळखले जाते. या तलावाला अनेकजण शाप मानतात. या तलावाने अनेक जणांचा जीव घेतला आहे. याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.हे खुनी तलाव फरिदाबादमधील सूरजकुंड येथे आहे. हे तलाव म्हणजे सात खाणींचा संग्रह आहे. या खाणी नंतर नैसर्गिक क्रिस्टल वॉटरने भरून गेल्या आहेत. या खाणी खूप खोल आहे आणि येथे पोहण्यावर बंदी आहे. या तलावामध्ये अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या जातात. आधी येथे जाण्याची परवानगी नव्हती. मात्र आता हे तलाव पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. हे तलाव भारद्वाज तलाव या नावानेही ओळखले जाते. या तलावामधील पाण्याचा रंग निळा आहे. १९९१ मध्ये खाणकामासाठी हे तलाव खोदण्यात आले होते. त्यानंतर ते एवढे खोल झाले की त्याचे खोदकाम हे भूजलापर्यंत पोहोचले. त्यानंतर या तलावाचे रूपंतर हे नैसर्गिक तलालामध्ये झाले. या तलावमध्ये आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या मते हे तलाव दरवर्षी तीन जणांचा बळी घेते. त्यामुळेच या तलावाला खुनी तलाव म्हणून ओळखले जाते. या तलावाच्या आसपासचा परिसर सुंदर आहे. दिल्ली एनसीआरमधील रहिवाशांसाठी हे पिकनिक आणि टुरिस्ट प्लेस बनले आहे. हे तलाव अरवली पर्वतात करण्यात आलेल्या अवैध खाणकामामुळे तयार झाले आहे. खाणकामामुळे येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे अपघात होत असतात. ते तलाव खूप खोल आहे. तरीही येथे सुरक्षेसाठी गार्डची तैनाती करण्यात आलेली नाही, तसेच इतर कुठलीही खबरदारी घेतली जात नाही. मात्र सावधानतेचा इशारा देणारे अनेक बोर्ड येथे लागलेले आहेत. 

टॅग्स :HaryanaहरयाणाJara hatkeजरा हटके