शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

'द काश्मीर फाइल्स'चा शो बंद पडल्याने मॉलमध्ये प्रेक्षकांनी घातला गोंधळ; पोलिसांनी सांगितले 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 21:29 IST

'The Kashmir Files' show stopped : गोंधळाची माहिती मिळताच दाखल झालेल्या सेक्टर-39 कोतवाली पोलिसांनी प्रेक्षकांना शांत केले आणि चित्रपट पुन्हा सुरू केला.

नोएडा: नोएडाच्या सेक्टर-38 ए मध्ये असलेल्या जीआयपी मॉलच्या थिएटरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट अचानक बंद पडल्याने गोंधळ झाला. मॉलमध्ये चित्रपटाचा शेवटचा शो सुरू होता. चित्रपटगृह व्यवस्थापकाने मुद्दाम चित्रपट थांबवल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे. 

गोंधळाची माहिती मिळताच दाखल झालेल्या सेक्टर-39 कोतवाली पोलिसांनी प्रेक्षकांना शांत केले आणि चित्रपट पुन्हा सुरू केला. त्याचवेळी पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, एसीमध्ये बिघाड झाल्याने मध्यंतरी काही काळ चित्रपट थांबवण्यात आला. यामागे दुसरे कोणतेही कारण समोर आलेले नाही. काश्मीर फाइल्स चित्रपट काश्मीरमध्ये 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचार (kashmiri pandit exodus) आणि रातोरात काश्मीर सोडण्याची वेदनादायक घटना वर्णन करतो.मंगळवारी रात्री उशिरा जीआयपी मॉलच्या थिएटरमध्ये काश्मीर फाइल्स चित्रपट सुरू होता. मध्येच चित्रपट थांबल्यानंतर प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा चित्रपट जाणूनबुजून बंद करण्यात आल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे. यानंतर गदारोळ सुरू झाला. चित्रपट थांबल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी भारत माता की जयचा जयघोष सुरू केला. ज्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोंगाटात भारत माता की जयच्या घोषणाही ऐकू येत आहेत. या गोंधळाची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांसह वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लोकांना समज देऊन शांत केले.एसीमध्ये बिघाड झालाएडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, एसीमध्ये बिघाड झाल्याने चित्रपट मध्यभागी थांबवण्यात आला. दुरुस्तीनंतर, चित्रपट पुन्हा सुरू करण्यात आला. या चित्रपटाबाबत लोकांमध्ये खूप भावनिक संबंध आहे, त्यामुळेच प्रेक्षकांना हा व्यत्यय सहन झाला नाही आणि त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत कोणाकडूनही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर चौकशी केली जाईल.

 

टॅग्स :The Kashmir Filesद काश्मीर फाइल्सPoliceपोलिस