शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

राजकीय पक्षांमागे अदृश्य हात; अज्ञात स्रोतांकडून २१७२ कोटींचा निधी, भाजप आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 09:12 IST

६५ टक्क्यांपेक्षा अधिकचा निधी अज्ञात स्त्रोतांकडील असून तो कुठून प्राप्त होतो, याचा शोध लागत नाही.

लोकशाहीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक लढविण्यासह लोकांपर्यंत विविध उपक्रमांमधून पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. मात्र हा पैसा पक्ष कुठून गोळा करतात हा प्रश्न आहे. राष्ट्रीय पक्षांकडून भारतीय निवडणूक आयोगाला प्राप्तिकर रिटर्न आणि देणग्यांचे तपशील दिले जातात. यातील अनेक स्त्रोत हे अज्ञात असतात. शिवाय २० हजार रुपयांपेक्षा कमी देणगी देणाऱ्यांची नावे उघड करणे राजकीय पक्षांना बंधनकारक नाही. परिणामी ६५ टक्क्यांपेक्षा अधिकचा निधी अज्ञात स्त्रोतांकडील असून तो कुठून प्राप्त होतो, याचा शोध लागत नाही.

अज्ञात स्रोतांचे आकडे

२००४-०५ ते २०२१-२२ दरम्यान सर्व राष्ट्रीय पक्षांनी अज्ञात स्त्रोतांकडून गोळा केलेला निधी १७,२४९ कोटी रुपये होता. २०२१ ते २०२२ या आर्थिक वर्षात भाजपने अज्ञात स्त्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाची रक्कम ११६१ कोटी रुपये घोषित केली. ती सर्व राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या (२१७२ कोटी) तुलनेत ५३.४५ टक्के आहे. तृणमूल काँग्रेसला अज्ञात स्त्रोतांकडून ५२८.०९३ कोटी रुपये मिळाले. - पक्षांनी अज्ञात स्त्रोतांकडून गोळा केलेल्या एकूण २१७२.२३१ कोटींपैकी १८११.९४२५ कोटी म्हणजे  ८३.४१४ टक्के उत्पन्न निवडणूक रोख्यांचे असल्याचे जाहीर केलेले आहे.

२०२१-२२ मध्ये पक्षांना मिळालेल्या देणग्यांचे विश्लेषण

आर्थिक वर्ष २००४-०५ ते २०२१-२२ या दरम्यान काँग्रेस आणि एनसीपीने एकूण ४३९८.५१ कोटी रुपयांची कमाई कुपन विक्रीतून केली आहे.  ऑडिट रिपोर्टनुसार तृणमूल काँग्रेसकडील एकूण दानाची रक्कम  ३८ लाख रुपये आहे. जी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या देणग्या वगळून आहे. परंतु पक्षाने २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणग्यांचा तपशिलात ४३ लाख रुपये दाखवले आहेत. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील पक्षाच्या तपशिलांमध्ये तफावत आढळते. सीपीआयने शुल्क, सदस्यत्व शुल्क, पक्षनिधी व निवडणूक निधीतून देणग्या जाहीर केल्या आहेत.

अज्ञात स्त्रोतांकडून प्राप्त उत्पन्न २०२१-२२

भाजप     १०३३    १२७    ००    ०.२४     ११६१ तृणमूल काँग्रेस     ५२८     ०.०५     ००     ००     ५२८ काँग्रेस     २३६    १६    १३५    १    ३८८ सीपीआय(एम)     ००    ५५     १०      १२      ७८ एनसीपी     १४     ०.०५     १.३     ०.०४     १५सीपीआय     ००     ०.०५१५     ००     ०.००११     ०.०५२६एनपीईपी     ००     ०.०७६     ००     ००     ०.०७६बीएसपी    ००     ००     ००     ००     ००एकूण      १८११     १९९     १४७     १३     २१७२

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Politicsराजकारण