शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाहुणे जेवणार सोन्या-चांदीच्या ताटात; २०० कारागिरांनी बनवली १५,००० चांदीची भांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 08:41 IST

‘आयरिस जयपूर’ने मंगळवारी नवी दिल्लीत सांगितले की, विविध लक्झरी हॉटेल्सने चांदीची भांडी पुरवठा करण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहणारे राष्ट्रप्रमुख आणि इतर जागतिक नेत्यांना भारताच्या सांस्कृतिक वारशाने प्रेरित कलाकृती असलेल्या सोन्या-चांदीच्या विशेष भांड्यांमध्ये जेवण दिले जाईल. जयपूरस्थित मेटलवेअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने ही माहिती दिली. 

‘आयरिस जयपूर’ने मंगळवारी नवी दिल्लीत सांगितले की, विविध लक्झरी हॉटेल्सने चांदीची भांडी पुरवठा करण्यास सांगितले आहे. विदेशी पाहुण्यांच्या डिनर आणि लंचसाठी या भांड्यांचा वापर केला जाणार आहे. चांदीच्या भांड्यांच्या कंपनीचे लक्ष पाबुवाल यांनी सांगितले की, बहुतेक भांड्यांमध्ये स्टील किंवा पितळेचा वापर केलेला असतो किंवा दोन्हींचे मिश्रण चांदीच्या लेपसह असते, तर काही भांडी जसे की प्लेटवर सोन्याचा मुलामा असतो. ते म्हणाले की, २०० कारागिरांनी जी-२० शिखर परिषदेसाठी सुमारे १५,००० चांदीची भांडी बनवली आहेत. 

अध्यक्ष बायडेन नेमके काय करणार? विकसनशील देशांसाठी काम करणे, हवामान, तंत्रज्ञान या मुद्यांसह बहुराष्ट्रीय विकास बँकांना आकार देणे यासारख्या विषयांवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे शिखर परिषदेत लक्ष केंद्रित करणार आहेत, असे व्हाइट व्हाउसने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा गट या विषयांवर प्रगती करू शकेल, अशी आशा व्हाइट हाउसने व्यक्त केली.

‘माझी पाळेमुळे भारतीय असल्याचा अभिमान’ माझी पाळेमुळे भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, असे मत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी व्यक्त केले. सुनक यांचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. भारताशी असलेल्या माझ्या संबंधाचा मला खूप अभिमान आहे. माझी पत्नी भारतीय आहे आणि एक हिंदू असल्याचा अर्थ आहे की, भारत आणि भारतासोबतच्या लोकांशी माझा नेहमीच स्नेह राहील.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारत