शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

"नवरदेव काळा...!", नवरीला 'वरमाला' घातल्यानंतर वाद पेटला; सालीच्या एन्ट्रीनं विवाह तुटला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 22:04 IST

नवरीच्या बहिणीच्या या एका विधानामुळे दोन्ही पक्षांत मोठा वाद निर्माण झाला...

बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका विवाहात वरमाला कार्यक्रम पार पडल्यानंतर, केवळ नवरदेव काळा आहे, असे कारण सांगत नवरीने लग्नास नकार दिला. यामुळे लग्नमंडपात एकच वाद पेटला आणि अखेर लग्न तुटले.

नेमकं काय घडलं? -मिळालेल्या माहितीनुसार, बरबीघा नगर परिसरात बुधवारी रात्री एका विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवादा येथून वधू पक्षाचे वऱ्हाड आले होते. सुरुवातीला सर्व विधी उत्साहात पार पडले, आनंदाच्या वातावरणात वरमाला कार्यक्रमही पार पडला. मात्र, या विधीनंतर लगेचच नवरीच्या बहिणीने नवरदेव पसंत नसल्याचे म्हटले. यासाठी तिने नवरदेव काळा असल्याचे कारण पुढे केले, यानंतर नवरीनेही लग्नास नकार दिला. नवरीच्या बहिणीच्या या एका विधानामुळे दोन्ही पक्षांत मोठा वाद निर्माण झाला.

रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी समझोता करण्याचा प्रयत्न झाला, मात्र नवरी आपल्या निर्णयावर ठाम होती. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. अखेर सात फेरे न घेताच वधू पक्ष निघून गेला. 

या अजब कारणामुळे परिसरात या लग्नाची चर्चा रंगली आहे. मिशन पोलीस ठाण्याचे प्रभारी आदित्य रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांत वाद झाला असला तरी अद्याप कोणाकडूनही लेखी तक्रार मिळालेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Groom's Dark Complexion Sparks Wedding Chaos; Sister's Entry Triggers Breakup!

Web Summary : In Bihar, a bride refused to marry due to the groom's dark complexion after the garland ceremony. The sister's objection ignited a dispute, leading to the wedding's cancellation despite police intervention. No formal complaint has been filed.
टॅग्स :Weddingशुभविवाहmarriageलग्नPoliceपोलिस