शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election 2022: WWE च्या रिंगणातून आता राजकारणात; ग्रेट खलीचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 14:31 IST

Punjab Election 2022 The Greate Khali: ग्रेट खली उर्फ दलिप राणा यानं निवडणुकीपूर्वीच केला भाजपमध्ये प्रवेश.

Punjab Election 2022 The Greate Khali: पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. WWE सारख्या इंटरनॅशनल फाईटद्वारे आपली ओळख निर्माण करणारा उमटवणारा ग्रेट खली ​(The Great Khali) उर्फ ​दलिप सिंग राणा यानं  भाजपमध्ये प्रवेश केला. दिलिप सिंग राणा यानं यापूर्वी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या प्रचारातही भाग घेतला होता.

दलिप सिंह राणा यानं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अलीकडच्या काळात अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबी अभिनेत्री माही गिलने या आठवड्याच्या सुरुवातीला भाजपमध्ये प्रवेश केला होता. दलिप सिंग राणा हे आतापर्यंत WWF मध्ये भारतातील सर्वात मोठं नाव आहे. दलिप सिंग राणा उर्फ ​​द ग्रेट खलीने या खेळात असताना सर्व प्रमुख चॅम्पियनशिप जिंकल्या. गेल्या काही काळापासून तो डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणापासून लांब आहे.  "भाजपचं धोरण भारताची प्रगती करण्याचं आहे. यापासूनच प्रभावित होत मी भाजपत सामील होण्याचा निर्णय घेतला. भाजपा माझ्यावर जी जबाबदारी देईल ती पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन," अशी प्रतिक्रिया त्यानं यावेळी दिली.

यापूर्वीही केलाय प्रचारदलिप सिंग राणा याआधीही राजकारणात दिसला आहे. २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत दलिप सिंग राणा यानं आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यानंतर तो आम आदमी पक्षात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दलिप सिंग राणानं डब्लूडब्ल्यूईमध्ये जाण्यासाठी पोलिसाची नोकरी सोडली होती. तसंच त्यानं बॉलिवूडमध्येही नशीब आजमावलं आहे.

टॅग्स :The Great Khaliद ग्रेट खलीPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा