शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

विजय मिळवला, पण 'या' एका गोष्टीनं वाढविलं टेन्शन, लोकसभेसाठी काँग्रेसला करावे लागणार मोठे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 09:00 IST

...ही आकडेवारी लक्षात घेता २०२४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी आणखी जोरकस प्रयत्न करावे लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकांत २२४ पैकी १३५ जागा काँग्रेसने जिंकून मोठा विजय मिळविला असला तरी त्यातील ४२ जागांवर काँग्रेस उमेदवार किमान १६ ते काही हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. ही आकडेवारी लक्षात घेता २०२४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी आणखी जोरकस प्रयत्न करावे लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

कर्नाटकमध्ये १३५ पैकी ६९ जागांवर काँग्रेसने ५० टक्क्यांहून अधिक मते मिळविली आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत या राज्यात २८ पैकी फक्त तीन जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. त्यावेळी भाजपला २० लोकसभा जागांवर ५० टक्क्यांहून अधिक तर अन्य पाच जागांवर ४५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आगामी लोकसभा निवडणुकांतही दमदार कामगिरी करेल, असा विश्वास त्या पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना वाटत आहे.

सर्व गटांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान- ३० वर्षांपासून गौडा समुदायाचा बालेकिल्ला व वोक्कलिगांचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने  उत्तम कामगिरी केली आहे. अशा ४२ जागांपैकी काँग्रेसने २२ जागा जिंकल्या आहेत. तर अशा सतरा जागांवर भाजपला, तीन जागांवर जेडीएस पक्षाला विजय मिळाला. - २०१८च्या विधानसभा निवडणुकांत ५ हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने ३० जागांवर उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेस, भाजप, जेडीएस या तीन पक्षांमध्ये अटीतटीची लढत झाली होती.- आगामी लोकसभा निवडणुकांत कर्नाटक काँग्रेसमधील सर्व गटांना एकत्र आणण्याचे व त्यांच्यातील संघर्ष थांबविण्याचे काम पक्षश्रेष्ठींना करावे लागेल. त्यात यश आले तरच लोकसभेत काँग्रेसला उत्तम यश मिळू शकते, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.

२०१८ साली २१३ मतांच्या फरकाने जिंकली जागा -केवळ सोळा मतांच्या आघाडीने भाजपचा उमेदवार जिंकल्याची घटना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत घडली होती. २०१८ साली विधानसभा निवडणुकांत २१३ मतांच्या फरकाने एक उमेदवार विजयी झाला होता. एक हजारहून कमी मतांच्या फरकाने आठ जागांवर उमेदवार विजयी झाले होते.

 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस