शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीने चक्क देवासोबत बांधली लग्नगाठ! हिंदू रीतीरिवाजांनुसार पार पडला विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:45 IST

८ डिसेंबरला हिंदू रीतीरिवाजांनुसार हा विवाह झाला. मुलीच्या लग्नात वडील सहभागी झाले नाहीत, आईने सर्व विधी पार पाडले.

जयपूर : मीरा संपूर्ण आयुष्यात भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन राहिली. जयपूर जिल्ह्यातील गोविंदगड पंचायत समितीच्या नृहसिंहपुरा गावात राहणाऱ्या तीस वर्षीय पूजा सिंहने देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन भगवान सालिगरामजींसोबत लग्न केले.

८ डिसेंबरला हिंदू रीतीरिवाजांनुसार हा विवाह झाला. मुलीच्या लग्नात वडील सहभागी झाले नाहीत, आईने सर्व विधी पार पाडले. साळीगरामजी आणि गावातील मंदिरातून वराच्या रूपात पूजेच्या घरी पोहोचलेल्या लोकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व विधी उरकण्यात आले. आई रतन कंवर या लग्नात आनंदी दिसत होत्या. (वृत्तसंस्था)

आईने लग्नाचे विधी पार पाडलेपूजाने राज्यशास्त्रात एमए केले आहे. वडील प्रेमसिंग बीएसएफमधून निवृत्त झाले आहेत आणि मध्य प्रदेशात सुरक्षा एजन्सी चालवतात. आई रतन कंवर या गृहिणी आहेत. तीन लहान भाऊ आहेत. सालिगरामजींशी लग्न करण्याचा निर्णय पूजाचाच होता. सुरुवातीला समाज, नातेवाईक आणि कुटुंबीयांना हे मान्य नव्हते, पण नंतर आईने मुलीच्या इच्छेला मान देऊन होकार दिला.

लोकांचा विचार केला नाहीलोकांनी पूजाचा हा निर्णय आणि लग्न स्वीकारले नाही, अनेकांनी विरोधही केला; पण, पूजाला त्याची पर्वा नव्हती. त्याचवेळी लग्न लावून दिलेले पंडित आचार्य राकेश कुमार यांनी सांगितले की, हिंदू रीतीरिवाजानुसार देवाशी लग्न करता येते.

का घेतला निर्णय?पूजाने सांगितले की, तिने समाजात जे पाहिले होते ते पाहून तिला लग्न करायचे नव्हते. जेव्हा लोक तिला टोमणे मारायला लागले, तेव्हा तिने देवाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून पती-पत्नींमध्ये क्षुल्लक गोष्टींवरून भांडण होत असल्याचे तिने पाहिले आहे. यामध्ये वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. पंडितजींना विचारले असता ते म्हणाले की, असे होऊ शकते. घरातील खोलीत एक छोटेसे मंदिर बनवले आहे, ज्यामध्ये सालिगरामजी आहेत. ती आता त्यांच्यासमोर जमिनीवर झोपते.

टॅग्स :marriageलग्न