शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेळा प्रेमात पडले परराष्ट्र मंत्री; जपानी आहे त्यांची दुसरी पत्नी; अशी आहे एस जयशंकर यांची Love Story!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:20 IST

S Jaishankar's love story : डॉ. एस. जयशंकर जेएनयूमध्ये शिकत असताना त्यांची ओळख शोभा यांच्याशी झाली. आधी दोघे मित्र होते. मात्र नंतर, मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. यानंतर दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर काही वर्षांनी...

S jaishankar Birthday : भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आज ९ जानेवारी २०२५ रोजी आपला ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. आपल्या हजरजबाबी क्षमतेमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या एस जयशंकर यांची प्रेमक कहाणीही तेवढीच खास आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे दोन लग्न झाले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शोभा असे होते. त्या भारतीय होत्या. तर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव क्योको सोमेकावा, असे आहे. त्या मुळच्या जपानच्या  आहेत.

शोभा यांच्यासोबत झाले होते पहिले लग्न -डॉ. एस. जयशंकर जेएनयूमध्ये शिकत असताना त्यांची ओळख शोभा यांच्याशी झाली. आधी दोघे मित्र होते. मात्र नंतर, मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. यानंतर दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर काही वर्षांनी शोभा यांना कर्करोग झाला. त्यांनी या आजाराशी काही काळ झुंजत दिली. मात्र, त्यांचे निधन झाले. शोभा यांच्या निधनानंतर, एस. जयशंकर हे जपानमधील टोकियो येथील भारतीय दूतावासात कार्यरत होते. येथेच त्याची ओळख क्योको सोमेकावा यांच्याशी झाली. क्योको त्याच्या दुसऱ्या पत्नी बनल्या. क्योको अनेकदा एस जयशंकर यांच्यासोबत राजकीय पार्ट्या आणि कार्यक्रमांतही दिसतात.

क्योको सोमेकावा यांची भेट -एस जयशंकर १९९६ ते २००० पर्यंत जपानची राजधानी टोकियो येथील भारतीय दूतावासात कार्यरत होते. जपानमधील या चार वर्षांच्या कार्यकाळात, एस. जयशंकर यांची त्यांची सध्याची पत्नी क्योको सोमेकावा यांच्यासोबत टोकियोतील भारतीय दूतावासात भेट झाली आणि त्यांची मैत्रीही झाली. एस. जयशंकर आणि त्यांची पत्नी क्योको यांच्याबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांचा वाढदिवसही ९ जानेवारीलाच असतो. 

एस. जयशंकर यांना ध्रुव आणि अर्जुन ही मुले तर मेघा नावाची मुलगी, असे तीन मुले आहेत. मेघा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे आणि तिने बीबीसीचा शो टॉकिंग मूव्हीजसाठी रिपोर्टर आणि कॅमरा ऑपरेटर म्हणूनही काम केले आहे. महत्वाचे म्हणजे, क्योको सोमेकावा या हिंदी भाषेतही अत्यंत चांगल्या प्रकारे बोलू शकतात. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरBJPभाजपाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट