शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर बांधणारे व रामभक्तांवर गोळीबार करणारे या दोघांमध्ये लढत; अमित शाह यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:12 IST

देवरिया येथील भाजपाचे उमेदवार शशांकमणी त्रिपाठी यांच्या प्रचारसभेत केले विधान

महाराजगंज/देवरिया: अयोध्येत राममंदिर बांधणारे व रामभक्तांवर गोळीबार करणारे या दोघांमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकांत लढत होत आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. देवरिया येथील भाजपचे उमेदवार शशांकमणी त्रिपाठी यांच्या प्रचारासाठी बुधवारी आयोजिलेल्या सभेत ते म्हणाले की, विरोधी पक्षांनी ७० वर्षे अयोध्येत राममंदिर बांधले जाऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे मंदिर उभारले गेले.

१९९० साली उत्तर प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमित शाह म्हणाले की, रामभक्तांवर गोळीबार करणाऱ्यांविरोधात या लोकसभा निवडणुकांत आम्ही लढत देत आहोत. देवरियाच्या आधी शाह यांची महाराजगंज येथे प्रचारसभा झाली. त्यात त्यांनी सांगितले की, काँग्रेस, समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर त्याचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांची मतमोजणी ४ जूनला होईल. त्या दिवशी राहुल गांधी व अखिलेश यादव हे दोन शहजादे ईव्हीएमला दोष देतील, अशी टीका अमित शाह यांनी केली. 

पाच वर्षांत पाच पीएम!

शाह म्हणाले की, पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडीला ३१० जागा मिळतील, अशी आम्हाला खात्री आहे. राहुल गांधी यांच्या पक्षाला ४० जागाही जिंकता येणार नाहीत. तर अखिलेश यादव यांना फक्त चार लोकसभा जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आली तर पुढील पाच वर्षांत पाच पंतप्रधान त्या खुर्चीवर विराजमान झालेले दिसतील, अशी टीकाही अमित शाह यांनी केली.

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणारच: गृहमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता आणि यापुढेही तो राहील. आम्ही हा भाग ताब्यात घेणारच. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, असे सांगून विरोधी पक्ष भारतातील नागरिकांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर