शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वडील म्हणाले, “जाऊन अभ्यास कर”; ९ वर्षीय ‘इन्स्टा क्वीन’नं जीवनच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 09:22 IST

एका ९ वर्षीय मुलीनं किरकोळ कारणावरून आपला जीवन प्रवास संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तामिळनाडूतील पेरियाकुप्पम येथून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथील एका ९ वर्षीय मुलीनं किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घटना घडली आहे. कथितरित्या तिच्या पालकांनी तिला अभ्यास करण्यास सांगितल्यानंतर तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय. या नऊ वर्षीय मुलीला तिचे शेजारी 'इन्स्टा क्वीन' म्हणत होते.

मुलीच्या वडिलांनी तिला आपल्या सासरच्या घराजवळ खेळताना पाहिलं. त्यानंतर तिला घरी जाऊन अभ्यास कर असं सांगत घराची चावी दिली. यानंतर ते आपल्या बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी बाहेर गेले. रात्री ८.१५ च्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना घर आतून बंद असल्याचं समजलं. यानंतर त्यांनी आपल्या मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितला.

परंतु त्या मुलीनं कोणताही प्रतिसाद न दिल्यानं ते घाबरले आणि मागची खिडकी तोडून त्यांनी आत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या मुलगी गळ्यात टॉवेल बांधून झटपटत असताना दिसली. तिला त्वरित त्या ठिकाणाहून रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु यादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम