शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 15:02 IST

"हिंसाचाराच्या परिस्थितीत महिलांचा वापर कदापी स्वीकार केला जाऊ शखत नाही. हे घटनात्मक आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. जर सरकार शांत राहिले, तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ, असे चीफ जस्टिस डीवाय चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले आहे."

मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून फिरवण्यात आल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घठनेनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. तसेच मणिपूरमध्ये रस्त्यावरही आंदोलने सुरू झाली आहेत. या मुद्द्यावरून विरोधक संसदेमध्ये आक्रमक होण्याच्या तयारीत असतानाच, सरकारही सक्रिय झाल्याचे दिसत आहे. एवढेच नाही, तर सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेत राज्य आणि केंद्र सरकारकडून उत्तरे मागवले आहे. पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे.

यातच, पावसाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेसंदर्भात संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान म्हणाले, ही घटना मनिपूरमध्ये झाली असली तरी, या घटनेमुळेसंपूर्ण देशाचा अपमान झाला आहे. तसेच 140 कोटी लोक या घटनेमुळे लज्जित आहेत. या घटनेत सहभागी असलेले सुटणार नाहीत. त्यांच्यावर संपूर्ण शक्तीनिशी आणि कडक कारवाई करण्यात येईल. महिलांवर अन्याय होऊ नये, यासाठी कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना केले.

..तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ - CJI यातच, सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेत तीव्र शब्दात भाष्य केले आहे. "हिंसाचाराच्या परिस्थितीत महिलांचा वापर कदापी स्वीकार केला जाऊ शखत नाही. हे घटनात्मक आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. जर सरकार शांत राहिले, तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ, असे चीफ जस्टिस डीवाय चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले आहे. एवढेच नाही, तर आतापर्यंत काय अ‍ॅक्शन घेतली, यासंदर्भात CJI ने केंद्र आणि राज्य सरकारकडून उत्तरही मागितले आहे. आता पुढील सुनावणी 28 जुलैला होार आहे.

अमित शाहंचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना निर्देश -यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडिओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, असे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना विचारले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. यातच, घटनेतील मुख्य आरोपीला थाउबल येथून अटक केल्याचेही समजते. तसेच इतर आरोपींचा शोद सुरू आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहSupreme Courtसर्वोच्च न्यायालयWomenमहिला