शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 19:31 IST

पोलीसांनी या जोडीला शोधण्यासाठी तीन पथके नियुक्त केली होती. मात्र, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. ते सापडत नव्हते. अखेर आज पोलिसांनी राहुल आणि सपना देवी यांना नेपाळ सीमेजवळ ताब्यात घेतले आहे. आता त्यांना अलिगडला आणण्यात येणार आहे.

सध्या उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्हा, हा एका अनोख्याच प्रकरणाने चर्चेत आहे. ही चर्चा आहे, 'होणाऱ्या सासू आणि होणाऱ्या जावयाच्या लव्ह स्टोरीची'. येथे एक महिला आपल्या मुलीच्या होणाऱ्या पतीसोबत अर्थात होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती. मात्र आता या लव्ह स्टोरीचा दी एंड होताना दिसत आहे. पोलिसांनी नेपाल सीमेजवळून या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर, सासूने रडत-रडत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

पोलीसांनी या जोडीला शोधण्यासाठी तीन पथके नियुक्त केली होती. मात्र, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. ते सापडत नव्हते. अखेर आज पोलिसांनी राहुल आणि सपना देवी यांना नेपाळ सीमेजवळ ताब्यात घेतले आहे. आता त्यांना अलिगडला आणण्यात येणार आहे.

महिलेनं केला असा खुलासा - माध्यमांतील वृत्तानुसार, चौकशीदरम्यान सपना म्हणाली, आपला नवरा दारू पिऊन आपल्याला नेहमी मारहाण करत होता. मुलीचे लग्न राहुलशी ठरल्यानंतर, जेव्हा जेव्हा राहुलचा फोन यायचा, तेव्हा आपण राहुलसोबत बोलायचो, यावरून आपली मुलगीही वेगवेगळे आरोप करत असे. पतीही शिवीगाळ करत असे आणि राहुलसोबत पळून जाण्याची धमकी देत ​​असे. यामुळे आपण राहूल सोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. याशिवाय तीने, आपल्याला मडराक पोलीस ठाण्यात नेऊ नये, आपल्याला दादों पोलीस ठाण्याची मदत मिळावी आहे, अशी विनंतीही पोलीस अधिकाऱ्यांना केली असेल्यचे एसपी ग्रामीण अमृत जैन यांनी सांगितले.

कसा कसा केला प्रवास? -दरम्यान, प्रियकर राहुलची चौकशी केली असता, "सपना एप्रिलमध्ये अलीगढहून कासगंजला आली, यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि बरेलीला पोहोचलो. यानंतर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पोहोचलो. तेथे मी माझा मोबाईल बघितला, तर सोशल मीडियावर आमचीच चर्चा सुरू होती. हे लक्षात घेत आम्ही झफ्फरपूरहून दिल्लीला पोहोचलो. तेथून बसने आलो आणि राया कट येथे उतरलो आणि तेथून गाडी भाड्याने घेऊन पोलीस ठाण्यात आलो.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसNepalनेपाळ