शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:01 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका डॉक्टरने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी नर्सची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैवान झालेल्या या डॉक्टरने आधी या नर्सला नशेचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर तिला कारखाली चिरडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका डॉक्टरने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी नर्सची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैवान झालेल्या या डॉक्टरने आधी या नर्सला नशेचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर तिला कारखाली चिरडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गंभीररीत्या जखमी झालेल्या या नर्सचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला पकडून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. आरोपी डॉक्टरचं नाव शिवपाल कश्यप असं आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार  ही घटना १६ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली.  एक २२ वर्षीय तरुणी बिथरी चैनपूर बायपासजवळ नग्न आणि जखमी अवस्थेत सापडली होता. रुग्णालयात उपचारांदरम्यान तिने पोलिसांना पूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर गेल्या रविवारी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉ. शिवपाल हा विवाहित होता. त्यामुळे सदर नर्सला वाटेतून हटवण्यासाठी त्याने हा भयानक कट रचला होता.

मृत तरुणीने एएनएमचा कोर्स केला होता. त्यानंतर ती आरोपी डॉक्टरच्या रुग्णालयात नोकरी करू लागली होती. दरम्यान, आरोपी डॉक्टर आणि या नर्समध्ये मैत्री झाली. तसेच ही मैत्री प्रेमामध्ये बदलली. सदर डॉक्टर हा विवाहित होता. मात्र त्याने आपल्या कुटुंबाबाबतची माहिती या तरुणीपासून लपवून ठेवली होती. डॉक्टरच्या या संबंधांबाबत कुटुंबाला कळले तेव्हा घरात सतत भांडणं होऊ लागली. त्यातच सदर तरुणी डॉक्टरकडे लग्नासाठी हट्ट धरत होती.

दरम्यान, सदर तरुणी खूपच हट्ट करू लागल्यावर डॉक्टरने तिला कोर्ट मॅरेज करण्याचे आश्वासन दिले. तसेच या तरुणीच्या डोक्याला कुंकू लावला. त्यानंतर लग्नाची जबाबदारी टाळण्यासाठी या डॉक्टरने भयानक कट रचला. त्याने १६ सप्टेंबर रोजी पोटदुखीचा बहामा करून  कारमध्ये बसवलं. त्यानंतर वाटेत त्याने या तरुणीला नशेची दोन इंजेक्शन दिली. त्यानंतर तिला कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचा मृत्यू झाल्याचं समजून घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान, जखमी अवस्थेत सापडलेल्या या तरुणीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारांदरम्यान, तिचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी