शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिष्याची गुरूवर मात! आत्मसन्मानाच्या नावाखाली शेट्टर यांचा ‘आत्मघात’; ३२ हजार मतांनी दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 10:46 IST

काँग्रेससाठी हा एक धक्का असला, तरी शेट्टर यांच्यासाठी हा राजकीय आत्मघात ठरला आहे. 

चंद्रकांत कित्तुरे -

हुबळी : उमेदवारी नाकारून भाजपने माझा आत्मसन्मान डिवचला, असे म्हणत काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघात भाजपचे महेश टेंगिनकाई यांच्याकडून पराभव झाला. काँग्रेससाठी हा एक धक्का असला, तरी शेट्टर यांच्यासाठी हा राजकीय आत्मघात ठरला आहे. 

 हुबळीत गेल्या सहा वेळा आमदार राहिलेले शेट्टर यांना भाजपने यावेळी उमेदवारी नाकारली. मात्र, आपल्याला विधानसभेत निरोपाचे भाषण करून सन्मानाने निवृत्त व्हायचे आहे, असे सांगून ते उमेदवारीसाठी आग्रही हाेते. आत्मसन्मानाच्या नावावर तसेच विकासकामांच्या जोरावर त्यांनी जोरदार प्रचार केला.  मी जाईन तिकडे या पक्षाचे कार्यकर्ते येतील, असे त्यांना वाटत होते. मात्र, त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. 

पराभवाची कारणे- गेली ३० वर्षे आमदार असल्याने प्रस्थापिताविरुद्धचा असंतोष n मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमविल्याचा आरोप  n राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हुबळीतील मोठी ताकद  n टेंगिनकाई यांचा शिस्तबद्ध प्रचार - मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमीचाही परिणाम

शिष्याची गुरूवर मात भाजपचे विजयी उमेदवार महेश टेंगिनकाई हे जगदीश शेट्टर यांना गुरू मानतात. शिष्याला आपण आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी शेट्टर यांना केले होते. त्यामुळे गुरू-शिष्याची लढाई म्हणूनही या लढतीकडे पाहिले जात होते. त्यात शिष्याने गुरूवर मात केली आहे.

अशी पडली मते -महेश टेंगिनकाई (भाजप) - ८४,६५८जगदीश शेट्टर (काँग्रेस) ­- ५०,४४७  

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस