शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यपथाच्या रूपाने देशाने रचला नवा इतिहास : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 07:31 IST

दिल्लीतील ‘राजपथाचे’ कर्तव्यपथ असे नामकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी एका शानदार समारंभात करण्यात आले.

नवी दिल्ली : गुलामगिरीचे प्रतीक असलेले ‘राजपथ’ हे नाव अस्तंगत होऊन त्याजागी आता ‘कर्तव्यपथ’ उद्याला आला आहे. कर्तव्यपथाच्या रूपाने भारताने एक नवा इतिहास रचला आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सांगितले.

दिल्लीतील ‘राजपथाचे’ कर्तव्यपथ असे नामकरण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी एका शानदार समारंभात करण्यात आले. तसेच इंडिया गेटजवळ उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधान मोदी यांनी अनावरण केले. त्यावेळी ते म्हणाले की, राजपथाचे कर्तव्यपथात होत असलेल्या रूपांतराचा सोहळा सारा देश पाहत आहे. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतकाळात कर्तव्यपथाचा ऐतिहासिक क्षण अवतरला आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस शूर, दूरदर्शी होते. भारत आपला गौरवशाली इतिहास कधीही विसरणार नाही असे ते नेहमी सांगत असत. नेताजींच्या विचारांनुसार स्वातंत्र्यप्राप्तीनंतर निर्णय घेण्यात आले असते तर देशाने आज नवी उंची गाठली असती; पण त्यांच्या विचारांचे विस्मरण झाले. मात्र, नेताजींच्या विचारांना आदर्श मानून आम्ही गेल्या आठ वर्षांपासून अनेक निर्णय घेतले आहेत. कर्तव्यपथावरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहील, असे  मोदी म्हणाले. 

सेंट्रल विस्टाचा महत्त्वपूर्ण भाग कर्तव्यपथ१३,४५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल विस्टा प्रकल्पामध्ये राजपथाचा पुनर्विकास याही गोष्टीचा अंतर्भाव होता. सेंट्रल विस्टामध्ये संसदेची नवी इमारत, पंतप्रधान, उपराष्ट्रपतींची नवी निवासस्थाने, विविध मंत्रालयांच्या नव्या इमारती बांधण्यात येत आहेत. नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, राष्ट्रपती भवनाच्या बाजूला असलेल्या सचिवालय इमारतींचे रूपांतर वस्तुसंग्रहालयांमध्ये करण्यात येईल. नवी दिल्ली महापालिकेकडून ठराव संमतराजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण करण्याचा ठराव नवी दिल्ली महापालिकेने बुधवारी संमत केला होता. त्यासाठी या महापालिकेची विशेष बैठक आयोजिण्यात आली होती, अशी माहिती लोकसभा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधान