शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 17:11 IST

Monsoon Update - उष्णतेच्या लाटांनी हैराण नागरिकांना हवामान खात्याच्या नवीन माहितीनं दिलासा मिळाला आहे. 

नवी दिल्ली - रखरखतं उन्ह आणि उकाड्याने हैराण नागरिकांना मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. त्यात हवामान विभागानं आनंदाची बातमी दिली आहे. पुढच्या काही तासात मान्सून भारतीय सीमेत प्रवेश करू शकतो. पुढील २४ तासांत मान्सून केरळात दाखल होईल. पुढील २४ तास म्हणजे ३० मे रोजी मान्सून केरळात धडकेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

केरळात यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होत आहे. राज्यात मान्सून सर्वसाधारण १ जूनपर्यंत दाखल होतो. यात कधी कधी ३-४ दिवस पुढे किंवा मागे होऊ शकतं. हवामान खात्यानुसार, ३० मे रोजी केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री होईल. त्यानंतर राज्यात जोरदार पाऊस पडेल. केरळात आधीच मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र दिसत आहे. केरळात प्री मान्सून लवकरच मान्सून पावसात बदलेल असं IMD नं म्हटलं आहे. IMD नं कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात रेड अलर्ट आणि ३ राज्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

दक्षिण पश्चिम मान्सून १ जूनच्या आसपास केरळात प्रवेश करतो. त्यानंतर तो उत्तरेच्या दिशेने जातो. १५ जुलैच्या आसपास संपूर्ण देशात पाऊस पडतो. त्याआधी २२ मेपासून अंदमान निकोबार येथे पावसाने धडक दिली आहे. यंदा सामान्यपणे ३ दिवस आधीच म्हणजे १९ मे रोजी अंदमानमध्ये मान्सूनच आगमन झालं आहे.

कोणत्या राज्यात कधी पाऊस येणार?

राज्यतारीख
अंदमान निकोबार२२ मे
बंगालची खाडी २६ मे
केरळ, तामिळनाडू ३० मे, १ जून
कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसामच्या काही भागात ५ जून
महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या वरच्या बाजूस, पश्चिम बंगाल१० जून
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहार १५ जून
गुजरात, मध्य प्रदेशातील काही भागात, उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यात२० जून
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर२५ जून
राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब ३० जून
राजस्थान ५ जुलै 

काही दिवसापूर्वी हवामान विभागाने मान्सूनबाबत एक अहवाल दिला होता.या अहवालानुसार, देशात एल निनो प्रणाली कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. मान्सून वेळेपूर्वी भारतात येऊ शकतो. तसेच ला नीना सोबतच, हिंद महासागर द्विध्रुव (IOD)परिस्थिती देखील यावर्षी चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, हे  मान्सूनसाठी सकारात्मक संकेत आहेत, असंही हवामान विभागाने म्हटले आहे. 

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसMonsoon forecastमोसमी पावसाचा अंदाजweatherहवामानRainपाऊस