शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागरी सेवा अधिकार विधेयक राज्यसभेत मंजूर होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 05:50 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वप्न भंगणार?

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय उलटविण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला होता. त्यासंदर्भातील विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळू नये म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्नशील आहेत. मात्र हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही आवश्यक बहुमत आहे. राज्यसभेत भाजपचे ९३ खासदार असून त्याशिवाय मोदी सरकारला लहान व प्रादेशिक पक्षांच्या २१ खासदारांचा पाठिंबा आहे.

राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा अधिकार विधेयक संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यसभेमध्ये मांडले जाणार आहे. त्या विरोधात मतदान करा अशी विनंती करण्यासाठी केजरीवाल विविध राज्यांत जाऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. अ श्रेणी व डॅनिक्स केडरमधील अधिकाऱ्यांची केंद्राने दिल्लीत प्रतिनियुक्ती केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची बदली व पोस्टिंगबाबतचे सारे अधिकार दिल्ली सरकारकडे असतील असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला होता.  

त्या अध्यादेशासंदर्भातील विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ नये म्हणून केजरीवाल यांनी कंबर कसली आहे. राज्यसभेतील आकडेवारी पाहिली तर ९३ सदस्य असलेल्या भाजपला अण्णा द्रमुक (४), अपक्ष व इतर (३) व नऊ लहान पक्षांचे प्रत्येकी एक खासदार अशा लोकांचा पाठिंबा आहे. या सभागृहातील पाच नामनियुक्त सदस्यही भाजपला मतदान करू शकतात. त्यामुळे राज्यसभेत भाजपला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या ११४ होते.

 राज्यसभेत विरोधकांचे बळराज्यसभेत विरोधी पक्षांची खासदारसंख्या याप्रमाणे आहे. काँग्रेस (३१), तृणमूल काँग्रेस (१२), आप (१०), राजद (६), माकप (५), जनता दल -युनायटेड (५), राष्ट्रवादी काँग्रेस (५), समाजवादी पक्ष (३), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट (३), भाकप (२), झारखंड मुक्ती मोर्चा (२), आययूएमएल (१), एमडीएमके (१), पीएमके (१), राष्ट्रीय लोक दल (१), टीएमसी-मूपनार (१). तसेच बिजद, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बसप यांचे २६ खासदार आहेत. मात्र ते एकतर केंद्र सरकारला पाठिंबा देतील किंवा मतदानाच्या वेळी तटस्थ राहतील. त्यामुळे हे संख्याबळ पाहता नागरी सेवा अधिकाराचे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ न देण्याचे केजरीवालांचे स्वप्न सत्यात उतरणे कठीण असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल