शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

भारताचं ‘चिकन नेक’ कापण्यास निघालेल्या बांगलादेशची केंद्रानं दाबली नस, केली अशी कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 10:59 IST

India Vs Bangladesh: बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतरापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण झालेले आहेत. दोन्ही देशांमध्ये मतभेद उफाळले असून, बांदलादेशकडून भारताला सातत्याने धमकीवजा आव्हान दिलं जात आहे.

बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतरापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण झालेले आहेत. दोन्ही देशांमध्ये मतभेद उफाळले असून, बांदलादेशकडून भारताला सातत्याने धमकीवजा आव्हान दिलं जात आहे. या तणावपूर्ण वातावरणादरम्यान, भारताने बांगलादेशवर मोठी कारवाई करत बांगलादेशला देण्यात येत असलेली ट्रान्स-शिपमेंट सुविधा अचानक बंद केली आहे. हा निर्णय बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पूर्वोत्तर भारताला देशाच्या मुख्य भागाशी जोडणाऱ्या चिकन नेक अर्थात सिलिगुडी कॉरिडॉरबाबत केलेल्या विधानानंतर घेण्यात आला आहे.

भारताची पूर्वोत्तरेतील राज्ये ही भूवेष्टित असून, या राज्यांना समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बांगलादेश हा एकमेव पर्याय आहे, असं विधान बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी केलं होतं. युनूस यांनी त्यांच्या हल्लीच झालेल्या चीन दौऱ्यावेळी हे विधान केलं होतं. त्याला भारताने तीव्र विरोध केला होता.

आता भारताने बांगलादेशला झटका देताना बांगलादेशला देण्यात येत असलेली ट्रान्स-शिपमेंट सुविधा बंद केली आहे. बांगलादेशला आपला माल भारतातील बंदरे आणि विमानतळांच्या माध्यमातून त्रयस्त देशात पाठवता यावा, यासाठी  भारताने २०२० मध्ये बांगलादेशला ही सुविधा दिली होती. या माध्यमातून बांगलादेश आपल्या वस्तूंची मध्य पूर्व, युरोप आणि इतर देशांमध्ये निर्यात करत असे. बांगलादेशला भारतामधून व्यापार करण्याची सुलभ संधी देणं हा या सुविधेचा एकमेव हेतू होता.

मात्र आता वित्त मंत्रायलयाच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने ही सुविधा रद्द केली आहे. बोर्डाच्या ८ एप्रिल रोजीच्या अधिसूचनेत म्हटल्याप्रमाणे जुना नियम तात्काळ प्रबावाने रद्द करण्यात आला आहे. जो माल आधीच भारतात आला आहे, त्याला जुन्या नियमांनुसार बाहेर जाऊ दिलं जाईल.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, या सुविधेमुळे आमची विमानतळे आणि बंदरांवर गर्दी वाढली होती. त्यामुळे भारताच्या आपल्या वस्तूंच्या निर्यातीमध्ये उशीर होत होता, तसेच खर्चही वाढत होता. त्यामुळे ८ एप्रिलपासून ही सुविधा ररद्द करण्यात आली आहे. मात्र नेपाळ आणि भूतानसाठी बांगलादेशचा माल हा भारतीय सीमेमधूनच जाईल. दरम्यान, केंद्र सरकारनं उचललेल्या या पावलाचं आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी स्वागत केलं आहे.  

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय