शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

केंद्र सरकार लागले कामाला! नवीन मंत्र्यांनी घेतला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 06:54 IST

Central Government News: एकाच वेळी बदल आणि सातत्य दर्शवत भारताच्या नवीन सरकारने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा कामाला सुरुवात केली. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदभार स्वीकारण्यासाठी आपापल्या कार्यालयात पोहोचले.

 नवी दिल्ली - एकाच वेळी बदल आणि सातत्य दर्शवत भारताच्या नवीन सरकारने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा कामाला सुरुवात केली. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदभार स्वीकारण्यासाठी आपापल्या कार्यालयात पोहोचले.

मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारून महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या. काहींनी प्रार्थना करून तर काहींनी त्यांच्या समर्थकांच्या घोषणाबाजीत पदभार स्वीकारला.  भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. २०१९ पासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत. कार्यभार स्वीकारण्यापूर्वी शाह यांनी शहरातील चाणक्यपुरी भागातील राष्ट्रीय पोलिस स्मारकाला भेट दिली आणि देशसेवा करताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.

सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण भागात समृद्धी आणण्याचे काम करू. आम्ही केवळ पुण्यापासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात हवाई सेवा विस्तारित करू. पुणे विमानतळाचे विस्तारीकरण करणे बाकी आहे. -मुरलीधर मोहोळ केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री 

सरकार योग आणि आयुर्वेदाचा जगभरात प्रचार करणार आहे. आता जगभरात योग आणि आयुर्वेदाचा प्रचार करणे, हे सरकारचे काम आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची युती मजबूत असून, विधानसभेत नक्कीच विजयी होईल.-प्रताप जाधव, आयुष आणि आरोग्य मंत्री 

नवीन सरकार भारताच्या सुरक्षेसाठी आपले प्रयत्न पुढील स्तरावर नेईल आणि भारताला दहशतवाद, अतिरेकी आणि नक्षलवादाच्या विरोधात मजबूत बालेकिल्ला म्हणून विकसित करील. -अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री‘इंडिया फर्स्ट’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भारतीय परराष्ट्र धोरणाची दोन मार्गदर्शक तत्त्वे असतील. चीनबरोबर काही सीमावादाच्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.-एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्रीजागतिक आणि स्थानिक पातळीवर दूरसंचार क्षेत्र, भारतीय टपाल विभाग या दोघांचीही महत्त्वाची भूमिका आहे. मी अनेक वर्षांपूर्वी २००७, २००८ आणि २००९ मध्ये या विभागात कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले. त्यामुळे माझ्यासाठी या विभागाशी माझे खूप भावनिक नाते आहे.-ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय दळणवळणमंत्रीसंसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. संख्याबळाच्या जोरावर एकमेकांना खाली पाडण्याची गरज नाही. संसदेबाहेर लोक बाहुबलाचा वापर करतात; पण सभागृहात आपण चांगल्या चर्चेसाठी भाषणाचा वापर केला पाहिजे.-किरेन रिजिजू, संसदीय कामकाजमंत्री

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAmit Shahअमित शाह