शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नववधूने आहेरात मागितला पक्का रस्ता, खासदारांनी महिनाभरात काम करण्याचं दिलं वचन, त्यानंतर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:02 IST

Politics News: एका नवविवाहितेने खासदार महोदयांकडे पक्क्या रस्त्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदार महोदयांनी एका महिन्यात रस्ता तयार करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर दिलेलं वचन पाळत सदर खासदार महोदयांनी ३५ दिवसांत रस्त्याचं काम पूर्ण केलं.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे खासदारांनी एका नवविहितेला आहेरात दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. ही घटना खैर तालुक्यातील कसीसों गावातील आहे. येथे मे महिन्यांत एका नवविवाहितेने खासदार महोदयांकडे पक्क्या रस्त्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदार महोदयांनी एका महिन्यात रस्ता तयार करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर दिलेलं वचन पाळत सदर खासदार महोदयांनी ३५ दिवसांत रस्त्याचं काम पूर्ण केलं.

मिळालेल्या माहितीनुसार कसीसो गावातील नवीन शर्मा यांचा मुलगा दीपांशू शर्मा याचा विवाह २ मे रोजी हाथरसमधील बमनोई गावातील राहणाऱ्या प्रियंका शर्मा हिच्याशी झाला होता. या लग्नामध्ये खासदार सतीश गौतम यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र ते कुठल्यातरी कारणामुळे लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, लग्नानंतर ८ मे रोजी खासदार सतीश गौतम हे आशीर्वाद देण्यासाठी नवीन शर्मा यांच्या घरी आले. त्यावेळी नववधू प्रियंका शर्मा हिने खासदार महोदयांकडे आहेरात पैसे न देता घरापासून शिवमंदिरापर्यंत पक्का रस्ता बांधून देण्याची मागणी केली. त्यानंतर खासदार महोदयांनीही प्रियंकाला पक्का रस्ता बांधून देण्याचं आश्वासन दिलं.

त्यानुसार खासदारांनी ३५ दिवसांमध्ये गावातील शिव मंदिरापासून नवीन शर्मांच्या घरापर्यंत १२० मीटर लांबीचा रस्ता बांधून दिला. १३ जून रोजी रस्ता बांधून पूर्ण झाला. पावसामुळे रस्त्याच्या बांधकामाला ५ दिवस अधिक लागले. खासदारांनी शब्द पाळत रस्ता बांधून दिल्याने प्रियंका हिने खासदार महोदयांचे आभार मानले आहेत.

ग्रामस्थांनी सांगितले की, रस्ता कच्चा असल्याने त्यांना शिवमंदिरापर्यंत जाण्यात अडचणी यायच्या. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी येत असे. तर सरपंच नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, हा रस्ता पक्का बांधण्यात यावा अशी मागणी नवीन शर्मा यांनी अनेकदा केली होती. मात्र पुरेसे बजेट नसल्याने ग्रामपंचायत स्तरावरून रस्ता बांधता आला नव्हता.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारणmarriageलग्न