शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

President Election: भाजपा लवकरच करणार राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा, ही नावं आघाडीवर, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 21:01 IST

President Election: भाजपा लवकरच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा ओबीसी किंवा कुठल्यातरी महिला नेत्याला राष्ट्रपदीपदाचा उमेदवार बनवू शकतो.

नवी दिल्ली - भाजपा लवकरच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा ओबीसी किंवा कुठल्यातरी महिला नेत्याला राष्ट्रपदीपदाचा उमेदवार बनवू शकतो. ओबीसी आणि महिलांची देशातील संख्या लक्षणीय आहे. मात्र अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि दक्षिण भारतातील उमेदवार यासारखी समीकरणे राजकीय वर्तुळात मांडली जात आहेत. पक्षाकडून सर्व शक्यतांची चाचपणी केली जात आहे. मात्र पक्ष सर्व शक्यतांची पडताळणी आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक विचारात घेऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा करेल.

देशात जातीच्या आधारावर जनगणनेची मागणी होत असतानाच राजकीय पक्षांना देशात ओबीसींची संख्या ही ४० टक्क्यांच्या वर असल्याची कल्पना आहे. तर लोकसंख्येतील महिलांचा वाटा हा जवळपास निम्मा आहे. महिला ह्या नवी व्होटबँक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार सांगितले आहे.उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत सर्व राज्यांमध्ये ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. हल्लीच उत्तर प्रदेशमध्ये काही ओबीसी नेते पक्षाबाहेर गेल्यानंतरही भाजपाला लक्षणीय बहुमत मिळाले होते. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूसह सर्वच पक्षांनी ओबीसी समुहाचा विश्वास जिंकण्यासाठी जातीआधारित जनगणनेची मागणी केली आहे. त्यामधील राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारपदासाठी संधी दिल्यास पक्षाला पुढील निवडणुकीत फायदा होऊ शकतो.

भाजपाचया एका वरिष्ठ नेत्याने सांगिकले की, महिला आणि ओबीसी दोन्ही स्वतंत्रपणे देशातील मतदारांचा एक मोठा भाग आहे. पक्ष वैयक्तिकपणे किंवा व्यक्तिगतपणे एकत्र ओबीसी महिला उमेदवाराल पदासाठी संधी देऊन दोन्ही प्रकारच्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. सध्या छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुया उईके, तामिळनाडूच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची नावं संभाव्य राष्ट्रपतीपदाच्य उमेदवारांमध्ये आहेत. तसेच झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचंही नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून समोर येत आहे.  

टॅग्स :BJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षPoliticsराजकारण