शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 19:49 IST

India-China News: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले असतानाच अमेरिकन गुप्तचर विभागाच्या एका गोपनीय अहवालामुळे खळबळ उडाली आहे.  या अहवालामधून चीनचं विस्तारवादी धोरण आणि भारतासमोर असलेलं सामरिक आव्हान याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले असतानाच अमेरिकन गुप्तचर विभागाच्या एका गोपनीय अहवालामुळे खळबळ उडाली आहे.  या अहवालामधून चीनचं विस्तारवादी धोरण आणि भारतासमोर असलेलं सामरिक आव्हान याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संरक्षण धोरण हे जागतिक नेतृत्वाला भक्कम करणे, चीनचा सामना करणे आणि भारताची लष्करी क्षमता वाढवण्यावर केंद्रित राहील, असे या अहवालात म्हटले आहे. भारत चीनला आपला प्रमुख प्रतिस्पर्धी मानतो. तर पाकिस्तानकडे नियंत्रणात ठेवता येण्यासारखं एक किरकोळ संरक्षणात्मक आव्हान म्हणून पाहतो, असेही या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकन गुप्तचर विभागाच्या या अहवालानुसार चीन आपल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तळांना म्यानमार, पाकिस्तान आमि श्रीलंका या देशांमध्ये स्थापित करण्याचा डाव आखत आहेत. या देशांच्या सीमा आणि सागरी हद्द भारताला लागून असल्याने जर यामध्ये चीनला यश आलं तर भारतासाठी मोठं लष्करी संकट निर्माण होऊ शकतं.

हा स्ट्रिंग ऑफ पर्ल्स रणनीतीचा भाग मानला जातो. त्याअंतर्गत चीन हिंदी महासागरामध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकन रिपोर्टनुसार हा प्रयत्न चीनची जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्याची चाल उघड करणारा आहे. तसेच याचा भारताच्या संरक्षण व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

या रिपोर्टनुसार ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानसोबत तणाव निर्माण झाला असला तरी भारत चीनकडेच सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका म्हणून पाहत आहे. भारत चीनचा प्रभाव कमी करून संतुलन साधण्यासाठी तसेच जागतिक नेतृत्वाची भूमिका प्रबळ करण्यासाठी हिंदी महासागर क्षेत्रात द्विपक्षीय संरक्षण करारांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत सैनिकी सराव, प्रशिक्षण, हत्यारांची विक्री आणि माहितीचं आदान-प्रदान यांचा समावेश आहे. भारताने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात त्रिपक्षीय सहभाग वाढवला आहे. तसेच क्वाड, ब्रिक्स, शांघाई सहयोग संघटना एशियान यासारख्या बहुराष्ट्रीय मंचांवर सक्रिय भूमिका निभावली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर २०२४ च्या अखेरीस भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील दोन वादग्रस्त भागातून सैन्याला मागे घेण्याबाबत सहमती दर्शवली होती. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील काही भागात तणाव कमी झाला आहे. मात्र सीमावाद अनिर्णित आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतUnited Statesअमेरिका