शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

लाल किल्ल्यामागील परिसरही जलमय; पाण्याची पातळी आणखी वाढल्यास दिल्लीपुढे मोठं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:41 IST

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील अनेक भागात पुराचा धोका वाढला आहे. हथनी कुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यानंतर यमुना नदीच्या पाण्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिल्लीतील काही रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. यमुना बँक मेट्रो स्थानकावरील प्रवेश आणि बाहेर जाण्याचे मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय अनेक जलशुद्धीकरण केंद्रे बंद करावी लागली.

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत. त्यामुळे दिल्लीतील काही भागात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यमुनेचे पाणी कमी होताच आम्ही ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू. जलसंकटामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल वजीराबाद जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. 

यमुनेच्या काठावरील अनेक भाग पाण्याखाली जात आहे. रिंगरोडपर्यंत पाणी पोहोचले आहे. काश्मिरे गेट बसस्थानकही धोकादायक स्थितीत आहे. राजघाट, आयटीओ, पुराणा किला परिसर जलमय झाला आहे. लाल किल्ल्यामागील परिसरात देखील पाणी शिरले आहे. जुनी दिल्ली रेल्वे स्थानकाकडे जाणारे रस्ते आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सखल भागातील घरे पाण्यात बुडाली आहेत.

यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दिल्लीतील अनेक भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यमुनेच्या पाण्याची पातळी २०८ मीटरच्या पुढे गेली आहे. यापूर्वी १९७८मध्ये प्रथमच लोखंडी पुलाजवळील पाण्याची पातळी २०७.४९ मीटर नोंदवण्यात आली होती. यमुनेला आलेल्या पुरामुळे सर्व मोठ्या नाल्यांचा प्रवाह पूर्णपणे थांबला आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढल्यास दिल्लीसाठी मोठे संकट उभे राहू शकते.

हिमाचलमध्ये २००० पर्यटकांची सुटका 

हिमाचलच्या कासोलमध्ये अडकलेल्या किमान २,००० पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. हिमाचलमध्ये शिमला-किन्नौर मार्गावर एक वाहन सतलज नदीत पडून एकाच कुटुंबातील चार सदस्य बेपत्ता झाले आहेत.  पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यात घराचे छत कोसळून एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. पंजाबच्या पटियाला, रूपनगर, मोगा, लुधियाना, मोहाली आदी भागांतून १० हजारांवर लोकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पौडी जिल्ह्यात एक कार पूर आलेल्या नदीत कोसळून त्यातील पाचपैकी तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.

टॅग्स :floodपूरdelhiदिल्लीRed Fortलाल किल्लाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल