शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गावात विमानतळ, ‘नेताजी की कोठी’चा चमत्कार; मुलायम सिंहांच्या गावानं देशाला केले अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 06:43 IST

इटावा जिल्ह्यातील अवघ्या आठ हजार लोकसंख्येच्या सैफई गावात स्टेडियमही 

सचिन जवळकोटेसैफई : अखिलेश यादव यांच्या कार्यपद्धतीबद्दल खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येच नाराजी. मात्र, मुलायमसिंहांबद्दल साऱ्याच पक्षातील नेत्यांना आजही आदर. त्यांनी त्यांच्या सैफईसारख्या इवल्याशा गावात करून दाखविलेला चमत्कार संपूर्ण देशाला अचंबित करणारा. आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावात विमानतळ, आंतरराष्ट्रीय स्टेडियम, आयुर्विज्ञान विश्वविद्यालय अन् दीड हजार खाटांचं मेडिकल कॉलेज यासह असंख्य संस्था. इटावा जिल्ह्यातील हे एक छोटंसं गाव. मात्र, मुलायमसिंह यांच्या दूरदृष्टीमुळे इथला कायापालट लक्षणीय.

याच गावात त्यांचा जन्म. इथंच शिक्षण झालं. शिक्षक म्हणूनही इथंच नोकरी लागली. राजकारणात आल्यानंतर मात्र त्यांनी मागं वळून कधीच पाहिलं नाही. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यापासून संरक्षणमंत्र्यापर्यंत अनेक उच्च पदं त्यांनी भूषविली. मात्र, घरातल्या भांडणामुळे सरत्या वयात ते हतबल झाले. सध्या ते राजकारणापासून अलिप्त, तरीही इथल्या परिसरात राजकारण चालतं केवळ ‘नेताजी’ या शब्दावरच.

हा पट्टा दूध-दुभत्यांचा. बहुतांश आलिशान बंगल्यांसमोर इम्पोर्टेड गाडीच्या बाजूलाच भारदस्त म्हशीही मोठ्या कौतुकाने बांधलेल्या. इथली श्रीमंती गाई-म्हशींच्या संख्येवर मोजणाऱ्या या गावात उत्तर प्रदेशातला सर्वात मोठा ‘सैफई महोत्सव’ही भरतो. कैक दशके डोळे मिटून निवडून येणाऱ्या मुलायमसिंहांच्या या करहल मतदारसंघात यंदा पुत्र अखिलेशांनी अर्ज भरलाय. यादवांसाठी हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ. पुत्राने आयुष्यभर कितीही उभा दावा मांडला, तरी शेवटी त्याच्यासाठी कामाला येते पित्याची पुण्याई, हेच इथे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

बंगला नहीं... कोठी बोलो!याच परिसरात तब्बल ३५० हेक्टरमध्ये इटावा लायन सफारी. जंगलात मुक्तपणे फिरणाऱ्या खऱ्याखुऱ्या सिंहांना पाहण्यासाठी रोज शेकडो लोक या ठिकाणी येतात. मात्र, मुलायमसिंहांचा भला मोठा बंगला पाहूनही पर्यटक भारावतात. रस्त्यावरच्या एका तरुणाला विचारलं, ‘इस बंगले में अब कौन रहता है?’ तेव्हा तो झटकन उत्तरला, ‘बंगला मत बोलो... नेताजी की कोठी बोलो. ये शान है हमरे गांव की.’

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादव