शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मोर्चादरम्यानच मोदी सरकारचं विधान, MSP संदर्भात कृषिमंत्र्यांनी संसदेत दिलं मोठं आश्वासन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:21 IST

महत्वाचे म्हणजे, शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीच्या दिशेने जाण्याचा प्लॅन करत असतानाच, शिवराज सिंह यांनी हे आश्वासन दिले आहे...

मोदी सरकार सर्व शेतमालाची खरेदी किमान आधारभूत किंमतीवर करेल, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. चौहान यांनी शुक्रवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान किमान आधारभूत किंमत (एमएसपी) या विषयावरील पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना शेतकरी बांधवांना हे आश्वासन दिले आहे.

महत्वाचे म्हणजे, शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीच्या दिशेने जाण्याचा प्लॅन करत असतानाच, शिवराज सिंह यांनी हे आश्वासन दिले आहे. सभागृहात माहिती देताना चौहान म्हणाले, “मला तुमच्या (अध्यक्ष) मार्फत सभागृहाला आश्वासन द्यायचे आहे की, शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाची किमान आधारभूत किंमतीवर खरेदी केली जाईल. हे मोदी सरकार आहे आणि मोदींची गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी आहे."

दस्तऐवज सभागृहाच्या पटलावर ठेवण्यास सहमत -चौहान म्हणाले, "दुसऱ्या बाजूला आमचे मित्र जेव्हा सत्तेत होते, तेव्हा त्यांनी रेकॉर्डवर सांगितले होते की, आम्ही एम एस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारू शकत नाहीत. विशेषत: उत्पादनाच्या खर्चापेक्षा 50 टक्के अधिक देण्याचा मुद्दा. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. यावेळी त्यांनी, आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ माजी कृषी राज्यमंत्री कांतीलाल भुरिया, कृषिमंत्री शरद पवार आणि केव्ही थॉमस यांचा हवालाही दिला.

चौहान यांच्या या विधानानंतर, वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी त्यांना त्यांच्या दाव्याच्या पुष्टीसाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. चौहान यांनीही, हे मान्य केले. एवढेच नाही तर, गत यूपीए सरकारने शेतकऱ्यांचा कधीही सन्मान केला नाही आणि कधीही शेतकऱ्यांच्या लाभदायक किंमतींच्या मागण्यांवर गांभीर्याने विचारही केला नाही, असा दावाही त्यांनी केला.

50 टक्क्यांपर्यंत मिळतोय लाभ -कृषिमंत्री पुढे म्हणाले, "मी आपल्या माध्यमाने सभागृहाला आश्वास्त करू इच्छितो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 पासून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर 50 टक्के लाभ देऊन किमान आधारभूत किंमत मोजण्याचा निर्णय घेतला आहे." याशिवाय, मोदी सरकार आधीपासूनच शेतकऱ्यांना लाभदायक भाव देत आहे, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरीRajya Sabhaराज्यसभा