शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"21व्या शतकात नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे, जे मोदीजी छातीवर लावून चालतात"; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:58 IST

राहुल गांधी म्हणाले, दोन लोक देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. आपण अर्थसंकल्पात तरुणांसाठी काय केले? यामुळे एका तरुणाला रोजगार मिळणार नाही.

जे अभिमन्यूसोबत करण्यात आले होते, ते भारतातील जनतेसोबत करण्यात येत आहे. चक्रव्यूहाचे आणखी एक रूप असते पद्मव्यूह, जे कमळासारखे असते, जे मोदीजी आपल्या छातीवर लावून चालतात. हे व्यूह मोदीजी, अमित शाहजी, मोहन भागवतजी, अजित डोभालजी, अंबानीजी, अदानीजी कंट्रोल करत आहेत. 21व्या शतकात नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे, असे म्हणत आज राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होते.

राहुल गांधींच्या विधानानंतर, सत्तापक्षातील सदस्यांनी गदारोळ सुरू केला. यावर स्पीकर ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना टोकले आणि म्हणाले की, आपल्या सदस्यांनीही म्हटले आहे की, जे सभागृहाचे सदस्य नाहीत त्यांचे नाव जायला नको. यावर राहुल गांधी म्हणाले, आपण म्हणत आहात तर, एनएसए, अंबानी आणि अदानी यांचे नाव काढून टाकतो.

आपण तरुणांना चक्रव्यूहात अडकवलं- राहुल गांधी म्हणाले, "दोन लोक देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. आपण अर्थसंकल्पात तरुणांसाठी काय केले? यामुळे एका तरुणाला रोजगार मिळणार नाही. हा इंटर्नशिप कार्यक्रम म्हणजे जोक आहे. कारण तुम्ही म्हणालात की, इंटर्नशिप देशातील टॉप 500 कंपन्यांमध्येच होईल. आधी तरूणाचा पाय तोडला आणि नंतर मलमपट्टी करत आहात."

सैन्यातील जवानांनाही अग्निवीरच्या चक्रव्यूहात अडकवले -"आपण तरुणांना एकीकडे पेपरलीक, तर दुसऱ्याबाजूला बेरोजगारीच्या चक्रव्यूहात अडकवले आहे. 10 वर्षांत 70 वेळा पेपर फुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र पेपेर फुटीसंदर्भात अर्थसंकल्पात एकदाही बोलले गेले नाही. अर्थसंकल्पात शिक्षणासाठी जो पैसा द्यायला हवा होता, तोही दिला गेला नाही. तर दुसऱ्या बाजूला आपण सैन्यातील जवानांनाही अग्निवीरच्या चक्रव्यूहात अडकवले आहे. अग्निवीरसाठी एक रुपयाही दिला नाही," असेही राहुल गांधी यावेली म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा