शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

१४४ वर्षांनी योग अन् झोपेत गेले जीव; कुंभमेळ्यात जागोजागी चपला अन् कपड्यांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 08:22 IST

४.२४ कोटी भाविकांनी बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत गंगा आणि संगमामध्ये स्नान केले. तसंच १९.९४ कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात आतापर्यंत स्नान केले असल्याचे सांगण्यात आले.

महाकुंभनगर : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात मंगळवारी उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीसाठी १४४ वर्षांनी आलेला योग महत्त्वाचे कारण ठरला आहे. सरकारसोबतच साधू-संतांनीही या शुभ योगाचे महत्त्व पटवून दिले होते. त्यामुळे लाखो भाविक संगमावर स्नानासाठी तासन् तास बसून किंवा झोपून होते. त्याचवेळी बॅरिकेड्स तोडून आत घुसलेल्या अनियंत्रित गर्दीने त्यांना चिरडले.

प्रत्यक्षदर्शींनी अंगावर काटा आणणारी ही स्थिती कथन केली. आसामहून आलेल्या मधुमिता यांनी सांगितले की, संगम घाटावर लोक सकाळ होण्याची वाट पाहत बसले होते आणि काही जण झोपले होते. त्याच वेळी, आखाड्यांच्या अमृतस्नानासाठी असलेले बॅरिकेड्स तोडत अनियंत्रित गर्दी घाटाच्या दिशेने धावली. घाटावर झोपलेले लोक त्या गर्दीच्या तावडीत सापडले आणि त्यांचा चेंगराचेंगरीत बळी गेला.

अचानक गर्दीचा लोट...  झारखंडच्या राम सुमिरन यांनी या घटनेबाबत सांगितले, की १४४ वर्षांनंतर आलेल्या या पुण्यस्नानाच्या संधीला कोणीही गमावू इच्छित नव्हते. म्हणूनच देशभरातून आलेले लाखो श्रद्धाळू संगम तटावर मोकळ्या आकाशाखाली बसले होते, पण अचानक गर्दीचा लोट आला आणि झोपलेले भाविक त्याखाली चिरडले गेले.

‘गंगामातेच्या इच्छेनेच हे झाले असावे’बिहारमधील बेगूसराय येथील बदामा देवी या वृद्ध महिलेने दु:ख व्यक्त करीत म्हटले, “बाळा, या जन्मात असा योग पुन्हा मिळेल की नाही, माहीत नाही. म्हणूनच इतक्या लांबून गंगामातेच्या दर्शनासाठी आलो. पण, हे माहीत नव्हते की इतकी मोठी दुर्घटना होईल. गंगामातेच्या इच्छेनेच हे झाले असावे.

जागोजागी चपला अन् कपड्यांचा खचघटनेनंतर जागोजागी पडलेल्या चपला आणि विखुरलेले कपडेच ही दुर्घटना किती भयानक होती, याचे साक्षीदार आहेत. अनेक महिला आणि पुरुष यात जखमी झाले. आखाड्यांतील नागा साधूंचे दर्शन घेण्यासाठीही मोठ्या संख्येने भाविक संगमावर थांबले होते.  ज्यांना गंगेच्या किनारी मोक्ष प्राप्त झाला ते भाग्यवान ठरले असे मला वाटते, असे सुमिरन म्हणाले.

घटनेनंतरही भक्तांचा ओघ कायम  मोबाइलवर चेंगराचेंगरीची घटना कळूनही कुंभमेळ्यात दाखल होणाऱ्या भाविकांच्या उत्साहात कोणतीही घट दिसली नाही. देशभरातील भाविक सतत मेळ्यात येत आहेत. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराज