शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...त्या 'बाळा'ची केली बालसुधारगृहात रवानगी, आरोपीच्या वकिलांनी खटल्याबाबत केला मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 22:28 IST

Pune Car Accident : पुण्यातील अपघात प्रकरणी आज बाल हक्क न्यायालयाने या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर त्या अल्पवयीन मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी खटल्याबाबत महत्त्वपूर्ण दावा केला आहे. 

पुण्यातील कल्याणीनगर येथे बड्या उद्योगपतीच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून केलेल्या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा सुरू असून, आज बाल हक्क न्यायालयाने या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर त्या अल्पवयीन मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी खटल्याबाबत महत्त्वपूर्ण दावा केला आहे. 

प्रशांत पाटील म्हणाले की, आज तीन  न्यायाधिशांच्या समोर सुनावणी झाली. सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी कल्याणीनगरमधे झालेल्या अपघातानंतर या मुलाबाबत समाजात रोष असल्याने त्याला इजा पोहचू शकते. त्यामुळे बाहेर रहाणे या मुलासाठी धोकादायक ठरू शकते, असं मत मांडलं. त्यानंतर या अल्पवयीन मुलाला ५ जूनपर्यंत बाल निरिक्षण गृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.

प्रशांत पाटील म्हणाले की, या मुलावर तो सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे पोलीस तपासात काय समोर येईल, त्या आधारावर ठरेल.  २ किंवा ३ महिन्यांत जेव्हा पोलिसांचा तपास पूर्ण होईल, त्यानंतर पोलीस न्यायालयासमोर बाजू मांडतील.  त्यानंतर न्यायालय या मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे ठरवेल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच हा मुलगा बाल निरिक्षण गृहात असताना पोलीस त्याची चौकशी करू शकणार नाहीत, कारण अशी कायद्यात तरतूद नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, अल्पवयीन मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळाने त्याला पंधरा दिवस येरवडा विभागातील ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचे नियोजन करावे. अपघातावर त्याने निबंध लिहावा या अटी, शर्तीवर जामीन दिला. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बैठकही घेतली होती. त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा बाल हक्क न्यायालयात अपिल करण्यात आली. त्यावर बाल हक्क न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पुणे अपघातप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला बालसुधारगृहात ठेवणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्या सुधारगृहात तो सज्ञान कि अज्ञान हे ठरणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हCourtन्यायालय