सुधारित सुनंदाप्रकरणी थरूर यांची दुसऱ्यांदा चौकशी
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:29+5:302015-02-13T00:38:29+5:30
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची आज गुरुवारी विशेष तपास पथकाने(एसआयटी) दुसऱ्यांदा चौकशी केली़ थरूर यांना गत चार आठवड्यात दुसऱ्यांदा एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे़ सुनंदा यांच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणाशी निगडीत विविध बिंदूंवर तसेच आयपीएल वादसंबंधित अनेक प्रश्न थरूर यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आल्याचे कळते़

सुधारित सुनंदाप्रकरणी थरूर यांची दुसऱ्यांदा चौकशी
न ी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची आज गुरुवारी विशेष तपास पथकाने(एसआयटी) दुसऱ्यांदा चौकशी केली़ थरूर यांना गत चार आठवड्यात दुसऱ्यांदा एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे़ सुनंदा यांच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणाशी निगडीत विविध बिंदूंवर तसेच आयपीएल वादसंबंधित अनेक प्रश्न थरूर यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आल्याचे कळते़दिवसभरात दोन टप्प्यात सुमारे साडेचार तास थरूर यांची चौकशी झाली़ दुपारच्या टप्प्यात थरूर आणि त्यांचा वाहनचालक बजरंगी यांना सामोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली़ थरूर सर्वप्रथम सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात पोहोचले़ येथून सकाळी ११.३० वाजता थरूर यांना दक्षिण दिल्लीच्या वसंत विहार भागातील वाहन चोरीविरोधी पथकाच्या कार्यालयात नेण्यात आले़ येथे एटीएसच्या पाच अधिकाऱ्यांनी थरूर यांची चौकशी केली़ यापूर्वी १९ जानेवारीला त्यांना एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते़सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये थरूर परराष्ट्र राज्यमंत्री असताना थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांना आयपीएलच्या कोची संघाचे ७० कोटी रुपयांचे समभाग फुकटात मिळवून देण्यासाठी पदाचा वापर केला, असा आरोप त्यांच्यावर झाला होता़ थरूर यांनी हा आरोप फेटाळून लावला होता़ याबाबत थरूर यांना प्रश्न विचारण्यात आले़ याशिवाय गतवर्षी १५ जानेवारीला सुनंदा व थरूर यांच्यात विमानतळावर झालेले कथित भांडण आणि त्यानंतर थरूर यांना विमानतळावर एकटे सोडून सुनंदा यांनी लीला हॉटेलमध्ये केलेला प्रवेश या घटनाक्रमाबाबतही प्रश्न विचारण्यात आले़ याच लीला हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी सुनंदा मृतावस्थेत आढळल्या होत्या़ या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आतापर्यंत १५ लोकांची चौकशी केली आहे़ यात थरूर, त्यांचे कर्मचारी आणि जवळच्या मित्रांचा समावेश आहे़ सुनंदा यांचा मुलगा शिव मेनन यालाही गत ५ फेबु्रवारीला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़ यावेळी शिव मेननला थरूर आणि त्यांची पत्नी सुनंदा यांच्यातील नातेसंबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले होते़