थरूर प्रथमच पोलिसांसमोर

By Admin | Updated: January 20, 2015 01:32 IST2015-01-20T01:32:24+5:302015-01-20T01:32:24+5:30

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा पोलिसांनी सोमवारी प्रथमच जाबजबाब घेतला.

Tharoor first time in front of police | थरूर प्रथमच पोलिसांसमोर

थरूर प्रथमच पोलिसांसमोर

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण : विशेष तपास पथकाने घेतला जाबजबाब
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा पोलिसांनी सोमवारी प्रथमच जाबजबाब घेतला. त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूला एक वर्ष उलटले असून हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन आठवड्यांनी थरूर यांना विशेष तपास पथकाने पाचारण केले होते.
थरूर सोमवारी रात्री ८ वाजता दक्षिण दिल्लीच्या एएटीएस पोलीस कार्यालयात पोहोचले. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) पाच सदस्यांनी त्यांना प्रश्न विचारल्याचे पोलिसांनी सांगितले. दक्षिण दिल्लीच्या एएटीएस पोलीस ठाण्यात एसआयटीचे तात्पुरते कार्यालय असून त्या ठिकाणी जाण्यापूर्वी थरूर यांनी लोधी इस्टेट येथील आपल्या निवासस्थानी वकिलांसोबत चर्चा केली. पत्रकारांना दूर ठेवण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

च्गेल्यावर्षी १७ जानेवारी रोजी दिल्लीतील एका आलिशान हॉटेलमध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळून आला होता. तेव्हापासून त्यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सुरू आहे.

च्पोलिसांनी अलीकडेच सुनंदा यांची विष देऊन हत्या करण्यात आल्याचा दावा करीत गुन्हा दाखल केल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळले असून थरूर हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

Web Title: Tharoor first time in front of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.