शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक झाला, निर्भयाच्या आईने मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:45 IST

२0१२ साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर अनेक मोर्चे निघाले, आंदोलने झाली, पुढे त्या मुलीवर बलात्कार करून, तिची हत्या करणा-यांना शिक्षाही झाली. या सर्व काळात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्या कुटुंबाच्या सतत संपर्कात होते.

नवी दिल्ली : २0१२ साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर अनेक मोर्चे निघाले, आंदोलने झाली, पुढे त्या मुलीवर बलात्कार करून, तिची हत्या करणा-यांना शिक्षाही झाली. या सर्व काळात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्या कुटुंबाच्या सतत संपर्कात होते. त्यांच्या मदतीनेच निर्भयाचा भाऊ आज वैमानिक झाला आहे. निर्भयाच्या आईनेच ही माहिती देताना राहुल यांचे आभार मानले.राहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक झाला, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. निर्भया प्रकरणामुळे आम्ही पार कोलमडून गेलो होतो. अनेक जणांनी सांत्वन केले, मदतीचा हात पुढे केला. त्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा याही होत्या. त्या नियमितपणे आमच्या संपर्कात होत्या, असे आईने सांगितले आहे. राहुल यांनीच आपल्या मुलाला वैमानिक होण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हेतर, त्याच्या शिक्षणाचा सारा खर्चही त्यांनीच केला. ते नियमितपणे त्यांच्या संपर्कात होते. ते त्याला प्रोत्साहन देत राहिले. खटल्याच्या बातम्यांमुळे त्याचे मन विचलित होत असे. अशा काळात त्याला सावरण्याचे कामही त्यांनी केले, असे आईने सांगितले.- मुलाला लष्करात जाण्याची इच्छा आहे, हे कळताच राहुल गांधी यांनी त्याला वैमानिक होण्याचा सल्ला दिला. तो बारावी झाल्यानंतर रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान उड्डाण अ‍ॅकेडमीमध्ये त्याला प्रवेश मिळावा, यासाठी साह्य केले. प्रशिक्षणाचा सारा खर्चही राहुल यांनीच केला, असे निर्भयाच्या आईने म्हटले आहे.- सध्या निर्भयाचा भाऊ गुरगावमध्ये पुढील प्रशिक्षण घेत आहे. त्यानंतर तो प्रत्यक्ष विमानाचे उड्डाण करू शकेल, अशी माहितीही त्याच्या आईने दिली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी