मोदींना लोकशाहीचा अर्थ समजावल्याबद्दल न्यायालयाचे आभार - राहुल गांधी

By Admin | Updated: July 13, 2016 13:23 IST2016-07-13T13:23:47+5:302016-07-13T13:23:47+5:30

अरुणाचलप्रदेश संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

Thanking the court for Modi's understanding of democracy - Rahul Gandhi | मोदींना लोकशाहीचा अर्थ समजावल्याबद्दल न्यायालयाचे आभार - राहुल गांधी

मोदींना लोकशाहीचा अर्थ समजावल्याबद्दल न्यायालयाचे आभार - राहुल गांधी

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - अरुणाचलप्रदेश संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. "पंतप्रधानांना लोकशाहीचा अर्थ समाजावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार" असे राहुल गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अरुणाचलप्रदेशच्या राज्यापालांचे सर्व आदेश रद्द करत काँग्रेसला सत्ता बहाल करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक आहे. कारण राष्ट्रपती राजवटी अंतर्गत केंद्र सरकारने जे सरकार बर्खास्त केले होते.
सर्वोच्च न्यायालयाने त्याच सरकारला पुन्हा सत्ता बहालीचा आदेश दिला. 
 
अशाच प्रकारे उत्तराखंडमध्ये सत्तेवर आलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. 
 

Web Title: Thanking the court for Modi's understanding of democracy - Rahul Gandhi