ठाकूर जमात न्यायासाठी संघर्ष करणार

By Admin | Updated: January 24, 2016 22:20 IST2016-01-24T22:20:49+5:302016-01-24T22:20:49+5:30

बैठक : जातपडताळणी समिती पूर्वग्रह दुषित

Thakur tribe will fight for justice | ठाकूर जमात न्यायासाठी संघर्ष करणार

ठाकूर जमात न्यायासाठी संघर्ष करणार

ठक : जातपडताळणी समिती पूर्वग्रह दुषित
जळगाव : अनुसुचित ठाकूर जमातीचे लोक आपल्या न्याय हक्कासाठी न्यायालयीन, प्रशासकीय व प्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करणार आल्याचे आदिवासी ठाकूर जमातीचे कार्याध्यक्ष प्रताप सूर्यवंशी यांनी सांगितले.
आदिवासी ठाकूर जमातीच्या विचारमंथन मेळावा जमातीच्या पिंप्राळा परिसरातील सभागृहात रविवारी सकाळी ११ :३० वजाता आयोजित झाला.यावेळी सूर्यवंशी बोलत होते.अध्यक्षस्थानी अध्यक्ष रमेश ठाकूर होते. यावेळी आर.एम.ठाकूर, प्रदेश सरचिटणीस रणजित शिंदे, उपाध्यक्ष अंबादास ठाकूर, शामराव ठाकूर होते. सकाळ व दुपार अशा दोन सत्रात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
जमातीला, आदिवासी ठाकूर जमातीचे दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत. जिल्‘ासह संपूर्ण महाराष्ट्रभर समाजा विखूरलेला आहे. जात पडताळणी समिती ही पूर्वग्रह दुषित वृत्तीने अनुसुचित ठाकूर जमातीच्या लोकांना कायदेशीर हक्क व लाभांपासून वंचित ठेवण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करित असल्याने ठाकूर जमातीचे हजारो लोक पदोन्नती व नोकर्‍यांपासून वंचित असल्याचा सूर मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
मेळाव्याच्या दुपारच्या सत्रात रमेश ठाकूर,आर.एम.ठाकूर, सरचिटणीस रणजित शिंदे यांनी संघटनात्मक कायदेशिर मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन व आभार एस.पी.ठाकूर यांनी केले. यावेळी जिल्हाभारातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रशांत ठाकूर, संजय ठाकूर, डॉ. नरेंद्र ठाकूर, हिम्मत ठाकूर, योगेश ठाकूर, सूर्यकांत ठाकूर यांच्या सह पदाधिकारी व समाज बांधवानी परिश्रम घेतले.

Web Title: Thakur tribe will fight for justice