शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

बेळगावसह सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी ठाकरेंचे शिलेदार सरसावले; लोकसभेत मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:25 IST

Thackeray Group MP Arvind Sawant Lok Sabha News: लोकसभेचे कामकाज सुरू असताना ठाकरे गटाच्या खासदारांनी मराठी भाषेत मत व्यक्त करताना बेळगावसह सीमावर्ती भागाचा मुद्दा मांडला.

Thackeray Group MP Arvind Sawant Lok Sabha News: अलीकडेच बेळगाव, कारवार, निपाणीचा सीमा भागातील मुद्दा चर्चेला आता होता. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कन्नड येत नसल्याने त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. यावरून सीमा भागाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले. यातच आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत एक महत्त्वाची मागणी केली आहे. 

मुंबई-बंगळुरू या एसटी महामंडळाच्या बसला चित्रदुर्ग येथे अडवत कर्नाटकातील संघटनेच्या कार्यकर्त्यांना चालकास कन्नड भाषा येत नसल्याचे कारण देत मारहाण केली होती. याचे तीव्र पडसाद उमटल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी बस वाहतूक थांबवण्यात आली. कोल्हापूरसह सीमावर्ती जिल्ह्यातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांच्या बस महाराष्ट्रात येऊ देणार नसल्याचा इशारा दिला. परिणामी, कर्नाटकनेही त्यांची वाहतूक थांबवली होती. कालांतराने दोन्ही राज्यातील सेवा पूर्ववत झाल्या. परंतु, या निमित्ताने पुन्हा एकदा सीमावर्ती भागातील मुद्दा चर्चिला गेला. यातच लोकसभेत सीमावर्ती भागातील मुद्दा मांडत ठाकरे गटाचे खासदार यांनी मोठी मागणी करत, सरकारने पुढाकार घ्यावा, असे म्हटले आहे. 

बेळगाव, कारवार, निपाणी भागात राष्ट्रपती राजवट लावावी

आत्ता काय होते आहे की, बेळगावमध्ये मराठी भाषिक कोणी असेल किंवा मराठी भाषेसाठी कोणी प्रयत्न करत असेल, आंदोलन करत असेल, तर त्याला तडीपार केले जात आहे. शुभम शेळके नावाच्या एका कार्यकर्त्याला तडीपार केले जात आहे. या शुभम शेळके यांने विधानसभेची निवडणूक लढवलेली होती. म्हणून आपल्या माध्यमातून मागणी करतो की, या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा जो भूभाग आहे, त्यावर राष्ट्रपती राजवट लावावी आणि मराठी भाषिकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, ही विनंती, असे अरविंद सावंत यांनी लोकसभेत म्हटले आहे.  अरविंद सावंत यांनी लोकसभेत बोलताना थेट मराठी भाषेतूनच आपले मत मांडले.

दरम्यान,  सीमावर्ती भागातील मराठी भाषकांवर होत असलेल्या कारवाया, अन्याय यावरून महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना ठाकरे गट आणि शिवेसना शिंदे गट नेहमीच आक्रमक भूमिका मांडत असतात. सीमावर्ती भागातील मराठी भाषकांचे रक्षण व्हावे, त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी अनेकदा दोन्ही गट आक्रमक होताना पाहायला मिळतात. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या मागणीचे पुढे काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असेल, असे सांगितले जात आहे. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाArvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाKarnatakकर्नाटकbelgaonबेळगाव