ठाणेदाराने तीनपट वाढविला होता हप्ता
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30
ठाणेदाराने तीनपट वाढविला होता हप्ता

ठाणेदाराने तीनपट वाढविला होता हप्ता
ठ णेदाराने तीनपट वाढविला होता हप्ता एसीबीने आपल्याच अधिकाऱ्यावर केली कारवाई : पोलीस विभाग हादरले नागपूर : भद्रावतीचे ठाणेदार अशोक साखरकर एपीआयसह लाच घेताना सापडल्याने पोलीस विभाग हादरला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक दिवसानंतर त्यांच्याच विभागात तैनात असलेल्या एखाद्या अधिकाऱ्याला याप्रकारे लाच घेताना पकडले. अवैध वाहतुकीच्या मासिक हप्त्याची रक्कम १० हजाराहून ३५ हजार रुपये केल्यामुळे साखरकरला तुरुंगात जाण्याची वेळ आली. रेती वाहतूक करणारा आकाश वानखेडे यांच्या तक्रारीवरून एसीबीने साखरकर आणि त्याचा सहायक निरीक्षक शंकर चौधरी याला २० हजार रुपयाची लाच घेतांना पकडले आहे. साखरकर पूर्वी एसीबीमध्ये तैनात होते. सूत्रानुसार दीड वर्षांपूर्वी एसीबीमधून चंद्रपुरात बदली झाली होती. पहिले सिंदेवाही ठाण्यात तैनात होते. काही दिवसांपूर्वीच ते भद्रावती येथे बदलून आले होते. तक्रारकर्ता आकाश वानखेडे याचे तीन ते चार ट्रक आणि टिप्पर आहेत. तो पूर्वीच्या ठाणेदाराला रेती वाहतुकीच्या मोबदल्यात १० हजार रुपये देत होता. साखरकरने त्याला ३५ हजार रुपयांची मागणी केली. तीनपट अधिक रक्कम लाच देणे वानखेडेला शक्य नव्हते. साखरकर त्यापेक्षा कमी रक्कम घेण्यास तयार नव्हता. त्यामुळे वानखेडेचा व्यापारही प्रभावित होऊ लागला होता. मासिक हप्ता न देऊ शकल्याने वानखेडेने वाहतूकही कमी केली होती. ५ जुलै रोजी साखरकरच्या आदेशानुसार एपीआय चौधरीने वानखेडेचे वडील आणि वाहन चालकाला अवैध वाहतूक करतांना पकडले. तेव्हापासून साखरकर ३५ हजार रुपयाच्या हप्त्यासाठी तगादा लावू लागला. त्याने १० जुलै रोजी वानखेडेकडून १० हजार रुपये घेतले. उर्वरित २० हजार रुपये देण्यासाठी तो दबाव टाकू लागला. वानखेडेने वाहन फायनान्सवर घेतले होते. त्याला मासिक हप्ते भरणे कठीण जात होते. यातच ३५ हजार रुपयाच्या लाचेमुळे तो आणखीनच त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याने २७ जुलै रोजी एसीबी अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे तक्रार केली. जैन यांनी डीव्हायएसपी किशोर सुपारे यांच्यावर जबाबदारी सोपविली. सुपारे यांनी शनिवारी सायंकाळी साखरकर आणि चौधरी यांना रंगेहात पकडले.